मुक्तपीठ टीम
जर्मन कार निर्माता कंपनी ऑडीने भारतात लक्झरी एस युव्ही Q7 ची लिमिटेड एडिशन लाँच केली आहे. या एसयुव्हीला ३.०-लिटर व्ही६ इंजिन देण्यात आले आहे, जे ३३५ बीएचपी आणि ५०० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. Q7 च्या लिमिटेड एडिशनची एक्स-शोरूम किंमत ८८.०८ लाख रुपये इतकी आहे.
- एसयुव्ही फक्त ५.९ सेकंदात १०० किमीचा वेग वाढवते.
- एसयुव्हीचा टॉप स्पीड २५०किलोमीटर प्रति तास आहे.
- ही कार खूप खास असेल कारण तिचे फक्त ५० युनिट्स बनवले जातील.
- Q7 मध्ये पॅनोरामिक सनरूफ,
- १९-इंच अलॉय व्हील्स,
- १०.१-इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले,
- ओलुफसेन स्टिरिओ सिस्टम
- मेमरी फंक्शनसह पॉवर्ड सीट
- एअर प्युरिफायर
- दुसऱ्या आणि तिसऱ्या रोसाठी इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट, ३० शेड्स
- आठ एअरबॅग्ज
- ३६० डिग्री कॅमेरा आणि लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टम असे अनेक फिचर्स आहेत.
- लिमिटेड एडिशन Q7 चे इंटरनल फिचर्स देखील खास आहे.
- एसयूव्हीला नवीन बॅरिक ब्राऊन कलर देण्यात आला आहे.
- हा रंग फक्त लिमिटेड एडिशन Q7 मध्ये उपलब्ध असेल.
- त्याच्या ग्रिलमध्येही बदल करण्यात आले आहेत.
- एसयूव्हीची ऑक्टागोनल आउटलाइन तशीच आहे परंतु नवीन कॉब ट्रिममुळे एसयूव्हीचा पुढचा भाग अधिक चांगला झाला आहे.