मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा नुकताच ई-लिलाव झाला. सरदार पटेल यांच्या शिल्पाला लिलावात सर्वाधिक १४० जणांनी बोली लावली, तर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक दीड कोटी रुपयांची बोली लागली. सांस्कृतिक मंत्रालयाने ही माहिती दिली. सर्वाधिक बोली मिळवणाऱ्या वस्तूंमध्ये एक लाकडी गणेशमूर्ती होती, ज्यासाठी ११७ बोली प्राप्त झाल्या होत्या. त्याचप्रमाणे, पुणे मेट्रो मार्गाच्या स्मृतीचिन्हाला १०४ तर विजयी मशालच्या स्मृतिचिन्हास ९८ बोली प्राप्त झाल्या.
नीरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक बोली
- नीरज चोप्राच्या सुवर्ण पदक मिळवुन देणाऱ्या भाल्याला सर्वाधिक बोली लावण्यात आली.
- त्यानंतर भवानी देवीने स्वाक्षरी केलेल्या तलवारीला १.२५ कोटींची म्हणजेच सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची बोली लावण्यात आली.
- सुमित अँटिलच्या भाल्याला १.००२ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
- टोकियो २०२० पॅरालिम्पिक दलाच्या ऑटोग्राफ केलेल्या अंगवस्त्रमला १ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
- लवलिना बोर्गोहेनच्या बॉक्सिंग ग्लोव्हजला ९१ लाख रुपयांची बोली लागली.
भारतीय खेळाडूंची पॅरालिम्पिक आणि ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी
- पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या या लिलावात १३४८ स्मृतिचिन्हे ठेवण्यात आली होती.
- या स्मृतिचिन्हाना ८६०० बोली लावण्यात आल्या.
- भारतीय खेळाडूंनी यावेळी टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक दोन्हीमध्ये दमदार कामगिरी केली.
- त्यामुळेच ऑलिंपिक आणि पॅरालिम्पिक मधील खेळाडूंच्या वस्तूंना सर्वाधिक बोली लागली.
खेळाडूंकडून मोदींना भेटवस्तू
- टोकियो ऑलम्पिक वरून परतल्यानंतर पंतप्रधानांनी खेळाडूंची भेट घेतली.
- जागतिक स्तरावरील खेळाच्या उत्तम प्रदर्शनासाठी सर्वांचे कौतुक केले.
- या भेटीमध्ये खेळाडूंनी पंतप्रधान मोदींना काही भेटवस्तू दिल्या.
- या सर्व भेटवस्तूंची देखील लिलाव करण्यात आला.
- ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक दीड कोटींची बोली लागली.
- भवानी देवीच्या ऑटोग्राफ केलेल्या तलवारीला १.२५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
- सुमित अँटिलच्या भालाला १.२ कोटी रुपयांची बोली लागली.