मुक्तपीठ टीम
लता मंगेशकर यांनी रविवारी आपल्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांचं पार्थिव शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारासाठी आणलं गेलं. अंत्यसंस्कारांपूर्वी पार्थिव काही काळ दर्शनासाठी ठेवलं गेलं होतं. दिदींच्या अंत्यदर्शनासाठी अनेक दिग्गजांनी शिवाजी पार्कवर हजेरी लावली. यावेळी शाहरुख खान याने लता दिदींना पुष्पचक्र वाहिलं. शाहरुखने त्यानंतर दुवा पढायला सुरुवात केली, त्यावेळी दुवा पढून झाल्यानंतर त्याने मास्क खाली केला आणि तो पुढे वाकला. त्यावेळी त्याने फुंकर मारली. मात्र शाहरुख खानने केलेल्या एका कृतीवरून आता सर्वत्र चर्चा होत आहे. अनेकांनी शाहरुख खानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.
शाहरुखने नेमकं काय केलं?
- लता मंगेशकर यांचं पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी शाहरुख खान आपली मॅनेजर पूजा ददलानीसह शिवाजी पार्कमध्ये उपस्थित होता.
- शाहरुख आणि पूजा दीदींच्या पार्थिवाजवळ आल्यानंतर शाहरुखने पुष्पचक्र वाहिलं.
- शाहरुखने त्यानंतर दुवा पढायला सुरुवात केली, त्यावेळी त्याचा मास्क त्याच्या चेहऱ्यावर होता.
- दुवा पढून झाल्यानंतर त्याने मास्क खाली केला आणि तो पुढे वाकला. त्यावेळी त्याने फुंकर मारली.
- यानंतर शाहरुख आणि पूजा दोघांनी लतादीदींच्या पार्थिवाला प्रदक्षिणा घातली.
- प्रदक्षिणा पूर्ण करून शाहरुखने आधी हात जोडून आणि मग वाकून पार्थिवाला नमस्कार केला.
- शाहरुखने मास्क काढून जे केलं ते काय होतं आणि ते का केलं असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय.
दुवा फुंकणं…
इस्लाममध्ये एखाद्या व्यक्तीला अखेरचा निरोप देताना त्याच्या पार्थिवावर फुंकर मारल्यास पार्थिवासोबतच्या नकारात्मक शक्ती दूर लोटल्या जातात असा समज आहे. त्यामुळेच इस्लाम रिवाजानुसार मृत व्यक्तीच्या पार्थिवावर फुंकर मारली जाते.शाहरुखनेही मास्क खाली घेऊन पार्थिवाकडे पाहून फुंकर मारली आहे.
क्या इसने थूका है ❓ pic.twitter.com/RZOa2NVM5I
— Arun Yadav (@beingarun28) February 6, 2022
इतनी नफ़रत भी मत फैलाइए कि खुद से नज़र मिलाना भी मुश्किल हो जाए। https://t.co/5FjIEcQbY0
— Meenakshi Joshi 🇮🇳 (@IMinakshiJoshi) February 7, 2022
ये झूठ और नफ़रत फैलाने वाला घिनौना नेता @beingarun28 प्रधानमंत्री @narendramodi की पार्टी का है। मोदी ऐसे ही वीभत्स लोगों को पालते हैं। https://t.co/CCCUXwJ8Za
— Vinod Kapri (@vinodkapri) February 6, 2022