मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगत असतानाच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर झालेला गोळीबार खळबळ माजवणारा ठरला आहे. ओवेसी हे मेरठ येथून दिल्लीकडे जात असताना एका टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीवर तीन ते चार हल्लेखोरांनी गोळीबार केला. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. दरम्यान गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात मेरठ पोलिसांना यश आलं आहे. त्यातील एक आरोपी सचिन हा फेसबुकवर सचिन हिंदू या नावाने वावरत असे आणि त्याच्या अनेक पोस्ट या धर्मांध म्हणता येतील अशा आहेत.
सचिनच्या अनेक पोस्ट या धर्मांध!
- देशभक्त सचिन हिंदू या नावाने त्याचे फेसबुक प्रोफाईल आहे.
- सचिन अनेकदा धर्मांध म्हणता येतील अशा पोस्ट करत असे.
- भाजपच्या अनेक नेत्यांसोबत त्यांचे फोटोही आहेत.
- तो नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही पोस्ट करतो. सचिन अविवाहित असून, वडील विनोद कंपनीत मजूर म्हणून काम करतात.
- सचिनने गावात ओवेसींच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती बहुतेकांना नाही.
- मात्र, पोलिसांनी गावात येऊन त्याच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी नेले आहे.
नेमकं काय घडले?
- खासदार अससुद्दीन ओवेसी हे मेरठवरुर परतत असताना राष्ट्रीय महामार्ग २४ वर हापुडा-गाजियाबाद या ठिकाणी छिजारसी टोल प्लाझाजवळ त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला.
- त्यानंतर आपली गाडी पंक्चर झाली आणि आपण दुसऱ्या गाडीच्या मदतीने त्या ठिकाणाहून निघाले.
- या हल्ल्यात कुणालाही काही इजा झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
- या घटनेची तात्काळ दखल घेऊन मेरठ पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले होते आणि त्यांनी तातडीने तपासाचा आदेश दिला होता.
- ओवेसींवरील हल्ल्या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आलीय. सचिन आणि शुभम अशी त्याची नावं असल्याचं स्पष्ट झालंय.
ओवेसींच्या भाषणांचा राग म्हणून केला गोळीबार!
घटनेची माहिती मिळताच आरोपीच्या घरी पोहोचल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशीही केली. बदलपूर पोलिसांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात सचिनला ओवेसीच्या वक्तव्याचा राग आल्याचे समोर आले आहे.