मुक्तपीठ टीम
शुक्रवारी सर्वत्र राज्यभरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. मोठ्या जल्लोषात निरोप मिरवणुका काढत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मात्र दुसरीकडे जळगाव जिल्हातील मेहरुण परिसरात एक धक्कादायत घटना घडली. बाप्पाच्या विसर्जनावेळी एका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी निष्ठावान राहिलेल्या महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या घरावर पेटते सुतळी बॉम्ब आणि दगड फेकले. या घटनेनंतर पोलिसांनी रात्रीच चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
महापौरांच्या घरावर दगड, सुतळी बॉम्बने हल्ला!!
- मेहरुन परिसरात महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळून एका सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक जात होती.
- मंडळाचे कार्यकर्ते महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळ आले असता, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात महापौर महाजन यांच्या घरावर गुलाल फेकला.
- तसेच काही वेळाने दगड आणि पेटते सुतळी बॉम्बसुद्धा फेकले.
- घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांनी महापौरांचे निवासस्थान गाठले आणि घटनेची माहिती घेतली.
- घटनेनंतर संबंधित सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती आहे त्या परिस्थितीत घटनास्थळावर सोडून पळ काढला.
- यावेळी कारच्या काचाही फोडण्यात आल्या असून त्यामुळे नुकसान झाले आहे.
महापौरांच्या जाऊबाई यांना मारहाण करत घरावर दगडफेक!!
- या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
- घटना घडली त्यावेळी महापौर जयश्री महाजन घरी नव्हत्या.
- नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झालेले त्यांचे सासरे एकटे घरी होते.
- यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गोण्याच्या गोण्या गुलाल महापौरांच्या घरावर उधळला.
- यावेळी महाजनांच्या जाऊबाईंनी संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
- घरात सासरे आजारी असल्याचेही सांगितलं.
- मात्र त्याकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले व समजूत घालणाऱ्या महापौरांच्या जाऊबाई यांना मारहाण करत घरावर दगडफेक केली, अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली.
महापौर जयश्री महाजन संतप्त!!
- मेहरुण परिसर अतिशय संवेदनशील असतानाही तिथे एकही पोलीस कर्मचारी नव्हता.
- तसेच घटल्यानंतर घडल्यानंतर या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी आले.
- त्यांनी पाहणी केली.
- मात्र त्यानंतरही त्यांनी ही घटना वरिष्ठांना कळवली नसल्याचा आरोपही यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी केला.