मुक्तपीठ टीम
भारतामध्ये तैवानची प्रमुख टेक कंपनी ‘आसुस’ने ६ नवीन आणि वेगळे क्रोमबुक लॅपटॉप लॉन्च केले आहेत. हे लॅपटॉप्स १७ हजार ९९९ रुपये ते २४ हजार ९९९ रुपये या किंमतीच्या टप्प्यातील आहेत. कोरोनाच्या संकटकाळात मुळे घरीच बसून ऑनलाईन अभ्यास करत आहेत. ते लक्षात घेऊन आसुसने हे क्रोमबूक लॅपटॉप सादर केले आहेत. हे लॅपटॉप मुलांचा अभ्यासापासून ते ऑफिसच्या वर्क फ्रॉम होम कामांसाठीही उपयोगी आहेत.
आसुस नवीन लॅपटॉप रेंजमध्ये क्रोमबूक फ्लीप सी २१४, क्रोमबुक सी२२३, क्रोमबीक सी४२३ आणि क्रोमबूक सी५२३ लॅपटॉपचा समावेश आहे.
आसुसच्या माहितीनुसार, क्रोमबुक फ्लिप सी-२१४ लॅपटॉप खास विद्यार्थ्यांसाठी डिजाइन केला आहे. हे ३६०-डिग्री कन्वर्टिबल टच-स्क्रीन डिस्प्ले, डुअल कॅमेरा सोबत येते. यात एका ऑटोफोकस कॅमेराही आहे. या लॅपटॉपचा टॅबलेट म्हणून सुद्धा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर लॅपटॉप मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी सोबत येतो.
लॅपटॉपच्या किंमती
- आसुस क्रोमबूक सी-२२३ नवीन रेंज मध्ये सर्वात स्वस्त मॉडेल आहे.
- सोबतच कंपनीने याची किंमत १७,९९९ रुपये आहे.
- आसुस क्रोमबूक सी-४२३ नॉन-टच वेरिएंट १९,९९९ रुपयात उपलब्ध होईल.
- आसुस क्रोमबूक सी-५२३ चे नॉन-टच मॉडल २०,९९९ रुपयात खरेदी करता येईल.
- आसुस क्रोमबूक सी ४२३ आणि सी ५२३ ने टच वेरिएंटची किंमत २३ हजार ९९९ रुपये आणि २४ हजार ९९९ रुपये आहे.
- आसुस क्रोमबूक फ्लिप सी २१४ लॅपटॉप २३,९९९ रुपयात उपलब्ध होईल.
इतर फिचर्स
• आसुस क्रोमबूक सी२१४, सी४२३ आणि सी५२३ ६४जीबी स्टोरेज सोबत येते, तसेच सी२२३ मध्ये ३२जीबी स्टोरेजचा ऑप्शन आहे.
• सगळे मॉडेल ४जीबी रॅमला सपोर्ट करतात.
• कनेक्टिविटीसाठी, सगळ्या मॉडेलमध्ये टाइप-ए पोर्ट, माइक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि एक ऑडियो जॅक आहे.