मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीची तिसरी लाट उसळत असतानाच निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या विधानसभा निवडणुकांमध्ये आचारसंहितेचे पालन कठोरतेने करण्यात येईल, असे बजावतानाच मुख्य निवडणूक आयुक्त सुशिल चंद्र यांनी पाच राज्यांमधील निवडणुकांसाठी खास आचारसंहिता लागू केली जाईल असं जाहीर केलं आहे. यामुळे १५ जानेवारीपर्यंत तरी थेट सभांऐवजी व्हर्च्युअल सभांवर भर द्यावा लागणार आहे.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखा आयोगाने जाहीर केल्या आहेत. या सर्व राज्यांतील विधानसभांचा कार्यकाळ येत्या दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होत आहे.
कसा असणार निवडणुकांचा कार्यक्रम?
निवडणुकीची अधिसूचना ८ जानेवारी 2022
निवडणूक किती टप्प्यात?
- उत्तरप्रदेश – ७
- उत्तराखंड, पंजाब, गोवा – १
- मणिपूर – २
मतदान कधी?
उत्तरप्रदेश
- पहिला टप्पा – १० फेब्रुवारी
- उत्तराखंड, पंजाब, गोवा – १४ फेब्रुवारी
- मणिपूर – पहिला टप्पा – २७ फेब्रुवारी
- मतमोजणी – १० मार्च
ठळक माहिती
- देशातील ५ राज्यांच्या विधानसभांच्या ६९० जागांसाठी निवडणुका आहेत.
- या निवडणुकांमधील एकूण मतदारसंख्या १८ कोटी ३४ लाख आहे.
- कोरोना दरम्यान निवडणुका घेण्यासाठी नवीन आचारसंहिता लागू केले जातील.
- सर्व निवडणूक कर्मचारी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असतील. आवश्यकता आणि निकषांनुसार काहींना बुस्टर डोस दिले जातील.
कोरोनामुळे खास कडक आचारसंहिता
१५ जानेवारीपर्यंत रोड शो, रॅली, पदयात्रा, सायकल आणि स्कूटर रॅलीला परवानगी दिली जाणार नाही. व्हर्च्युअल रॅलीद्वारेच निवडणुकीच्या प्रचाराला परवानगी असेल. विजयानंतर कोणतीही विजयी मिरवणूक काढली जाणार नाही. असेही बजावले आहे.