Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मराठा समाजाच्या हिताचा ठाकरे सरकारकडून कोल्ड ब्लडेड खून”

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

June 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
bjp Ashish shelar

मुक्तपीठ टीम

ज्या पध्दतीने कोल्ड ब्लडेड खून करणाऱ्यांची पुर्व तयारी व पुर्ण तयारी दिसत नाही. आरोपीचा भोळाभाबडा चेहरा समोर असला तरी दिसत नाही. तशाच प्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता शिवसेना यांनी मराठा समाजाच्या हिताचा कोल्ड ब्लडेड खून केला, असा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे केला.

 

मराठा आरक्षणाबाबत राज्यात निर्माण झालेल्या स्थिती बाबत चर्चा व मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी भाजपाचे नेते महाराष्ट्र दौरा करीत असून यातील चार दिवसाचा बीड, परळी, नांदेड असा दौरा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार करीत आहेत.

 

आज त्यांनी दुपारी मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी बीड येथे बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी भाजपा आमदार अँड लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा, सुरेश धस,जिल्हा अध्यक्ष राजेंद्र म्हस्के आदींसह पदाधिकारी उपस्थितीत होते. त्यानंतर आमदार अँड आशिष शेलार यांनी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.

 

यावेळी त्यांनी सांगितले की, जेव्हा कालेलकर आयोग आला ज्यामध्ये मराठा समाजाचा हिताचा विचार झाला पण तो अहवाल तत्कालीन सरकारने टेबलच केला नाही. मंडल आयोगाच्या वेळी एक संधी घेता आली असती ती घेतलीच नाही. बापट आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारले पण तो अहवाल ही सरकारने नाकारला नाही. वेगवेगळ्या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारणाऱ्या शिफारशी केल्या त्या शिफारशी तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने नाकारल्या नाहीत. त्यानंतर राणे समिती आली. खरंतर आयोगाची गरज होती पण समिती नेमली. अशा प्रकारे एक एक करत मराठा समाजाच्या हिताचा खून करण्याचे काम तत्कालीन आणि आजच्या सरकार मधील पक्षांनी केले. आज हीच लोकं भाजपाला शिकवण्याचे काम करीत आहेत. आम्हाला शिकवू नका. नाकाने कांदे सोलू नका. मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारला ठणकावले.

गायकवाड आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवून अहवाल दिला. तो अहवाल संपूर्ण पणे सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारने मांडला नाही. अन्यथा समाजाला मिळालेले फायदे टीकले असते.

 

म्हणून मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण हवे आहे त्यासाठी मराठा समाजाच्या आक्रोशाला भाजप पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून साथ देत आहे. त्यासोबतच ठाकरे सरकारने मराठा समाजाला ३ हजार कोटींचे पँकेज द्यावे, ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला लागू कराव्यात, तसेच अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला नख लावू नका अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. ईडब्ल्यूएस मध्ये मराठा समाजाला आरक्षण ठाकरे सरकारने दिले. त्यात तुमचे कर्तृत्व काय? आजपर्यंत मराठा मोर्चाची खिल्ली उडवणाऱ्या शिवसेनेची, छत्रपतींच्या वंशजाकडे पुरावे मागण्याची भावनाशून्यता दिसलीच होती आता कर्तृत्व शून्यतापण दिसली.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत ही पंधरा महिने काहीच न केल्याने ठाकरे सरकारने ओबीसी समाजाचे ही मोठे नुकसान केले. समाजासमाजात तेढ आणि भांडणे लावण्याचे काम इंग्रजांप्रमाणे ठाकरे सरकार करते आहे, असा आरोप ही त्यांनी केला


Tags: bjp ashish shelarchief minister uddhav thackerayshiv senaओबीसी आरक्षणभाजप आशिष शेलारमराठा आरक्षणमहाविकास आघाडी सरकारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

आज २९ हजार बरे! नंदुरबारमध्ये फक्त १९ रुग्ण! पण ४ जिल्ह्यांमध्ये नवे रुग्ण हजारावर!

Next Post

कोरोनामुक्त गावांना मिळणार ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे पुरस्कार

Next Post
hasan mushrif

कोरोनामुक्त गावांना मिळणार ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!