Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महाविकास आघाडीने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी बनवले”

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांची टीका

July 13, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ashish shelar

मुक्तपीठ टीम

महाविकास आघाडीने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी बनवले आहे. रुग्णांना सुविधा देण्यात सरकार कमी पडले. ज्या महाराष्ट्राची ओळख सकारात्मक होती त्याला गालबोट लावण्याचे काम आघाडी सरकारने केलं आहे. राज्यात दोन महिन्यात ५५.१९ टक्के मृत्यू झाले आहते. शहरातला कोरोना आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. हे सरकार लोकांच्या कामाचे नसून रक्तपिपासू बनले आहे, अशी टीका भाजपचे आमदार माजी मंत्री अँड आशिष शेलार यांनी केली. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. आमदार आशिष शेलार पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी सांगली शहर व ग्रामीण जिल्हा कोअर कमिटीच्या बैठका घेतल्या.

 

खासदार संजय काका पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार शिवाजीराव नाईक आदी सहभागी झाले होते.

 

त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सकारवर टीका करताना ते म्हणाले, सर्वच बाबतीत अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला लोकांच्या हिताचे देणे-घेणे नाही. करोनाचा संसर्ग रोखण्यात हे सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. राज्यात रुग्णांचा मृत्यू दर गेल्या दोन महिन्यांत ५५.१९ टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. महाविकास आघाडी सरकारने राज्याला देशात कोरोनाची राजधानी बनवले. केंद्र सरकारने दिलेल्या लशी लोकांना देण्यात नियोजन न झाल्यान हे केंद्र सरकारला दोष देतात. हे दुटप्पी सरकार आहे. केवळ राजकारण करायचे काम सुरू आहे. यातून या सरकारने बाहेर पडल पाहिजे. ठाकरे सरकारची वृत्ती रक्त पिपासूसारखी आहे.

 

कोरोना संसर्ग रोखण्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न, खतांचे वितरण, बोगत बियाणे, पीक विमा अशा या बाबतही सरकार अपयशी ठरल्याचे आमदार शेलार म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सरकारी वकिलांना योग्य माहिती दिली नाही. सहकार्य केले नाही असे सरकारी वकील मुकुल रोहतगी यांनी स्वतः सुप्रीम कोर्टात राज्य सरकारच्या असहकार्याबद्दल भाष्य केले होते. यातून राज्य सरकारचा मराठा आरक्षणाविरोधातील कुटील डाव स्पष्ट होतो, असे शेलार म्हणाले. ओबीसी आरक्षणाबाबत हीच परिस्थिती आहे केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचे काम केले जाते. जनतेमध्ये संभ्रम पसरवला जातो.

 

 


Tags: adv. ashish shelarBJPchief minister uddhav thackerayओबीसी आरक्षणकेंद्र सरकारभाजपामराठा आरक्षणमहाराष्ट्रमहाविकास आघाडीराज्य सरकार
Previous Post

मराठा समाजाला दिलासा, ESBC नियुक्त्या कायम, तर SEBC वयोमर्यादा मागासवर्गीयांप्रमाणेच!

Next Post

आज पाच वर्षे झाली…कोपर्डीच्या निर्भयाला न्याय कधी मिळणार?

Next Post
kopardi

आज पाच वर्षे झाली...कोपर्डीच्या निर्भयाला न्याय कधी मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!