मुक्तपीठ टीम
मुंबई ड्रग्ज क्रुझ पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह इतर सर्व आरोपींची रवानगी आर्थर रोडच्या कारागृहात करण्यात आली आहे. २० ऑक्टोबरला त्याच्या जामिन अर्जावर निर्णय येण्याची शक्यता आहे. याआधी त्याचा जामीन नाकारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आर्यन खानने एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंना शब्द दिला आहे. यापुढे मी चांगले काम करेन आणि एक दिवस तुम्हाला माझा अभिमान वाटेल, असे आर्यनने म्हटल्याचे सांगितले जात आहे.
काय म्हणाला आर्यन खान?
- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं समुपदेशन (काउन्सिलिंग) करण्यात आलं. दरम्यान, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आर्यन खाननं आश्वासन दिलं आहे की, यापुढे मी चांगले काम करेन आणि एक दिवस तुम्हाला माझा अभिमान वाटेल.
- तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर, गरिब लोकांना मदत करेन.
- तेव्हा त्याने भविष्यात आपले नाव चुकीच्या कारणासाठी प्रसिद्धीझोतात येणार नाही, याची काळजी घेईन.
आर्यन खानला मनी ऑर्डर
- दरम्यान, काही दिवसांपूर्वी आर्यन खानला कुटुंबीयांकडून ४५०० रुपयांची मनी ऑर्डर आली आहे.
- कारागृह प्राधिकरणाकडे ही मनी ऑर्डर पाठवावी लागते.
- हे पैसे आर्यनच्या कँटीनच्या खर्चासाठी कूपनच्या स्वरुपात दिले जातात.
- जेल मॅन्युअलनुसार, कोणत्याही कारागृहातील आरोपीला महिन्यातून एकदा मनीऑर्डर मिळू शकते, जी साडेचार हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.
- आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे २०ऑक्टोबरपर्यंत आता आर्यनला जेलमध्येच राहावं लागणार आहे.