Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तेच दोन हजार-पाचशेच्या नोटांचे डोंगर…ईडीचे मिशन बंगाल, ममता बॅनर्जीच खरं लक्ष्य?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Arpita Mukherjee who had Rs 20 crore at home in cash

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रासारखाच पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) ने पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापा टाकला आहे. यामुळे आता ईडीचे पुढचे मिशन पश्चिम बंगाल असल्याचे दिसत आहे. ईडीने अर्पिता मुखर्जीच्या घरातून २० कोटी रुपये जप्त केले आहेत. याशिवाय २० मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. घटनास्थळी आढळलेल्या नोटांमध्ये २ हजार आणि पाचशेच्या नोटांचा डोंगर झाला आहे. ईडीने नोटा मोजण्यासाठी मशीन मागवल्या आहेत. सध्या जरी आरोप बॅनर्जी सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर झाली असली, तरी ईडीच्या मिशन बंगालचं खरं लक्ष्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच असण्याची चर्चा आहे.

ईडीची छापेमारी सुरूच:

  • ईडीकडून पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्याशी संबंधित विविध परिसरांमध्ये शोध मोहीम राबवली जात आहे.
  • यामध्ये, ईडीने अर्पिता मुखर्जीच्या निवासी परिसरातून सुमारे २० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.
  • अर्पिता मुखर्जी पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय आहेत.
  • छाप्याबाबत ईडीने म्हटले आहे की, हा पैसा एसएससी घोटाळ्याशी संबंधित असल्याचा संशय आहे.

२ हजार आणि पाचशेच्या नोटांचा डोंगर !!

  • नोटांची संख्या इतकी होती की, नोटा मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली.
  • त्याच वेळी, ईडीने असेही सांगितले की अर्पिता मुखर्जीच्या परिसरातून २० हून अधिक मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत, ज्याचा उद्देश आणि वापर शोधला जात आहे.
  • घटनास्थळी आढळलेल्या नोटांमध्ये २ हजार आणि पाचशेच्या नोटांचा डोंगर झाला आहे.
  • ईडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ईडीने चटर्जी व्यतिरिक्त शिक्षण राज्यमंत्री परेश सी अधिकारी, आमदार माणिक भट्टाचार्य आणि इतरांच्या घरावर छापे टाकले.

दोन मंत्र्यांच्या घरावर छापा:

  • ईडीने आज सकाळी ७ वाजता पश्चिम बंगालचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांच्या घरावर छापा टाकला.
  • राज्याचे दुसरे मंत्री परेशचंद्र अधिकारी यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले.
  • याशिवाय ईडीने त्यांच्या अन्य १३ ठिकाणांवर छापे टाकले.

Tags: Arpita MukharjeeEDMaharashtraMamata Banerjeewest bengalअर्पिता मुखर्जीईडीपश्चिम बंगालपार्थ चॅटर्जीममता बॅनर्जीमहाराष्ट्र
Previous Post

फडणवीस स्टिंग, शुक्ला टॅपिंग चौकशी: भाजपाविरोधकांना टेन्शनच! पण पोलिसांवर विश्वास नाही की राज्य टिकण्याविषयी भीती?

Next Post

महाराष्ट्रात पुन्हा सीबीआय! आघाडीला भाजपाचं नवं टेन्शन! पण पोलिसांवर विश्वास नाही की सत्तेची भीती?

Next Post
महाराष्ट्रात पुन्हा सीबीआय! आघाडीला भाजपाचं नवं टेन्शन! पण पोलिसांवर विश्वास नाही की सत्तेची भीती?

महाराष्ट्रात पुन्हा सीबीआय! आघाडीला भाजपाचं नवं टेन्शन! पण पोलिसांवर विश्वास नाही की सत्तेची भीती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!