Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कॉस्ट अकाउंटंट्स, कंपनी सेक्रेटरीज संघटनांच्या विदेशी संघटनांबरोबरील करारांना मंजुरी

May 26, 2021
in सरकारी बातम्या
0
ICAI-ICSI

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) यांनी विविध देश / विदेशी संघटनांबरोबर केलेल्या सामंजस्य करारांना (एमओयू) पूर्वलक्ष्यी प्रभावाने मंजुरी दिली आहे.

 

इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीओएआय ) आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) यांनी इन्स्टिटयूट ऑफ पब्लिक अकाउंटन्स (आयपीए), ऑस्ट्रेलिया, चार्टर्ड इन्स्टिट्यूट फॉर सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट, ब्रिटन (सीआयएसआय)चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड अकाउंटन्सी (सीआयपीएफए), ब्रिटन, इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट्स, श्रीलंका आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड सेक्रेटरी अँड ऍडमिनिस्ट्रेटर्स (आयसीएसए), ब्रिटन या परदेशी संस्थांशी सामंजस्य करार केला आहे.

 

त्यांच्या कार्यक्षेत्रांशी संबंधित, वार्षिक परिषदा/प्रशिक्षण कार्यक्रम/कार्यशाळा, चर्चासत्रे आणि संयुक्त संशोधन प्रकल्प इत्यादींमध्ये सहभाग घेऊन ज्ञानाचे आदान प्रदान, अनुभव आणि तांत्रिक सहकार्य सामायिक करणे यासाठी परस्पर मान्यता आणि सहकार्याला मान्यता देण्यासाठी हे करार करण्यात आले आहेत.

प्रभाव

स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारामुळे लाभार्थी देशांमध्ये समानता, सार्वजनिक दायित्व आणि नावीन्यपूर्ण संशोधन संबंधी उद्दिष्टे साध्य होण्यात मदत होईल.

 

पार्श्वभूमी

  • कॉस्ट अकाऊंटन्सी व्यवसायाचे नियमन करण्यासाठी ‘कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स कायदा १९५९’ या संसदेच्या विशेष कायद्याद्वारे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीओएएल) ची स्थापना केली गेली.
  • केवळ कॉस्ट अकाउंटन्सीसाठी असलेली ही संस्था एकमेव मान्यताप्राप्त वैधानिक व्यावसायिक संस्था आणि परवाना देणारी संस्था आहे.
  • इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय) ही एक संवैधानिक संस्था आहे जी कंपनी सचिव कायदा १९८० द्वारे भारतात कंपनी सचिवांच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी स्थापन केली आहे.

Tags: prime minister narendra modiआयसीएसआयइन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियापंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

आता १ लाख ३६ हजार टपाल कार्यालयांमध्ये ‘महिंद्रा’चा हप्ता भरण्याची सोय

Next Post

सव्वा लाखासाठी मृतदेह रोखला, रुग्णालयाच्या कोरोना सेंटरची मान्यता रद्द

Next Post
mamata hospital

सव्वा लाखासाठी मृतदेह रोखला, रुग्णालयाच्या कोरोना सेंटरची मान्यता रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!