Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बारामतीमधील पाणीपुरवठा योजनांच्या ३१६ कोटी ८७ लाखांच्या कामांना मान्यता

January 7, 2022
in घडलं-बिघडलं
0
Approval for works of water supply schemes in Baramati

मुक्तपीठ टीम

बारामती मतदारसंघातील सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या ३१६ कोटी ८७ लाख रुपयांच्या प्रशासकीय कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रशासकीय मान्यतेचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केले.

            

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत बारामती (जि. पुणे) तालुक्यातील सहा  प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या ३१६ कोटी ८७ लाख रुपयांच्या कामांना ही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये देऊळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (६५.०८ कोटी), सुपे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (५७.९८ कोटी), लोणी भापकर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना  (५७.५८ कोटी), गोजुबावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (५१.१५ कोटी), कटफट प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (६४,३८ कोटी) आणि थोपटेवाडी लाटे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (२०,७० कोटी) अशा एकूण सहा योजनांच्या कामांचा समावेश आहे. 

            

राज्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणाऱ्या गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ओढाताण थांबावी यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग कार्यरत आहे. या योजना वेळेवर पूर्ण होतील, यादृष्टीने सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्याची माहितीही गुलाबराव पाटील यांनी दिली.

            

दरम्यान, जानेफळ कळंबेश्वर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. मेहकर जि. बुलढाणा) -१० कोटी रुपये , चिंचोली व ३० गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना  (ता. खामगाव व शेगाव जि. बुलढाणा)- ८८ कोटी ३५ लाख, पाडळी व ५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना  (ता. जि. बुलढाणा)- १६ कोटी ०९ लाख,  १७८ गावे पैठण ग्रीड पाणी पुरवठा योजना (ता. पैठण व औरंगाबाद जि. औरंगाबाद)- ३०७ कोटी, तेल्हारा व ६९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. तेल्हारा जि. अकोला- १४८ कोटी ४३ लाख रुपये, घाटपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. खामगाव जि. बुलढाणा)- १८ कोटी ७८ लाख रुपये आणि घोटी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना (ता. इगतपुरी, जि. नाशिक)- २२ कोटी रुपये निधीच्या या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.


Tags: ajit pawarbaramatiGulabrao Patilअजित पवारगुलाबराव पाटीलबारामती
Previous Post

मुंबईत पूर्णऐवजी मिनी लॉकडाऊनची शक्यता! रात्री संचारबंदीसह बंधनं कठोर होणार!!

Next Post

कोरोना चाचणी करणारा प्रत्येक तिसरा मुंबईकर पॉझिटिव्ह! तिसऱ्या लाटेनं सुरुवातीलाच दुसऱ्या लाटेला मागे टाकलं!

Next Post
Every third person positive in mumbai

कोरोना चाचणी करणारा प्रत्येक तिसरा मुंबईकर पॉझिटिव्ह! तिसऱ्या लाटेनं सुरुवातीलाच दुसऱ्या लाटेला मागे टाकलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!