Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिकच्या काष्टी येथे कृषि, उद्यानविद्या, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या तीन महाविद्यालयांना मंत्रिमंडळाची मान्‍यता

June 7, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Kashti Complex Nashik

मुक्तपीठ टीम

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, ता. मालेगाव जि. नाशिक येथे कृषि विज्ञान संकुलात यापूर्वी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय व वर्ष २०२१-२२ पासून अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय सुरु करण्यात आली आहेत. आता शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान ही तीन महाविद्यालये सुरु करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.         

Image 

कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, कृषि विज्ञान संकुलांतर्गत कृषि शिक्षणाबरोबरच कृषिपूरक उद्योग विकास, प्रक्रिया केंद्र, शेतकरी प्रशिक्षण केंद्र व सुविधा केंद्र, आदर्श रोपवाटीका संकुल, सर्व कृषि निविष्ठांचे संशोधन व निर्माण केंद्र इत्यादी कृषिविषयक उपक्रम विकसित करण्याचे नियोजन आहे. या संकुलामुळे नाशिक जिल्ह्यात एकत्रितरित्या कृषि शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होतील. कृषि पदवीधरांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे तसेच ग्रामपातळीवरील विस्तार कार्यकर्ते, ग्रामसेवक, कृषि मदतनिस, तज्ज्ञ प्रशिक्षक, कृषि संशोधक व आधुनिक शेतकरी यांना सहाय्य करुन देशाच्या कृषि क्षेत्रात मौल्यवान योगदान देणे, कृषि आधारित स्टार्टअप अंतर्गत उद्योग सुरु करण्यास मदत करणे आदी बाबी साध्य होण्यास मदत होणार आहे.          

कृषि महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय या महाविद्यालयांची विद्यार्थी प्रवेशक्षमता प्रत्येकी ६० विद्यार्थी असून अभ्यासक्रमाचा कालावधी ४ वर्षाचा आहे. तसेच कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची प्रवेशक्षमता ४० विद्यार्थी असून अभ्यासक्रम कालावधी ४ वर्षाचा आहे. या महाविद्यालयांच्या निर्मितीकरीता अंदाजे रु. ४९० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळ्यास अनुदान मर्यादा वाढवली

वाढती महागाई व डिझेलच्या दरात झालेली वाढ यासारख्या विपरीत परिस्थितीमुळे शेततळे खोदकाम करून जलसंचय करणे हे शेतकरी बांधवांना खर्चिक ठरत होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेततळे अनुदानाची मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.          

कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी शासनाने शेतकऱ्यांचे हित नजरेसमोर ठेवून अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले आहेत. राज्यात कोरडवाहू क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता, टंचाई परिस्थितीत शेतकरी बांधवांना पीक जगवणे जिकीरीचे ठरत होते. यापूर्वी शेततळे खोदकामासाठी ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. आता हे अनुदान ७५ हजार रुपये इतके देण्यात येणार आहे. या शेततळे योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन  कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. प्रतिकूल हवामान परिस्थितीतही शेतकरी बांधवांनी शेततळे व त्यावर आधारित फळबाग लागवड ही शेतीपद्धती आत्मसात करून कृषि निर्यातीत महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेले असल्याचेही दादाजी भुसे यांनी सांगितले.


Tags: Cabinet decisionDadaji BhuseKashtiMaharashtranashikउद्यानविद्याकाष्टीकृषिकृषि अभियांत्रिकीतंत्रज्ञाननाशिकमंत्रिमंडळ निर्णय
Previous Post

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण २०२० अंतर्गत प्रोत्साहनात्मक सुधारणा धोरणाची ३१ मार्च २०२७ पर्यंत अंमलबजावणी करण्यास मान्यता

Next Post

मुख्यमंत्री म्हणतात बुलेट ट्रेन मुंबईकरांसाठी काय कामाची? प्रशासकीय यंत्रणा मात्र बुलेट ट्रेनच्या दिमतीला!

Next Post
mahastra metro

मुख्यमंत्री म्हणतात बुलेट ट्रेन मुंबईकरांसाठी काय कामाची? प्रशासकीय यंत्रणा मात्र बुलेट ट्रेनच्या दिमतीला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!