मुक्तपीठ टीम
भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच एएआयमध्ये पदवीधर अॅप्रेंटिस, डिप्लोमा अॅप्रेंटिस आणि अशा आणखी पदांवर अॅप्रेंटिशिपची संधी आहे. पदवीधर अॅप्रेंटिस पदासाठी २५ जागा आणि डिप्लोमा अॅप्रेंटिस पदासाठी ३८ जागा आहेत. इतर पदांशी संबंधित अधिक माहिती तपासण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर असलेली अधिसूचना तपासावी. ने अप्रेंटिसच्या पदांसाठी भरतीसाठी एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पदवीधर अॅप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदवी २) डिप्लोमा अप्रेंटिसच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
महत्त्वाची सूचना
अर्ज करताना, उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांनी अर्जाचा फॉर्म नीट वाचावा, कारण फॉर्ममध्ये कोणतीही माहिती अपूर्ण राहिल्यास किंवा गैरसमज झाल्यास, अर्ज नाकारला जाईल.
अधिक माहितीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइट @aai.aero वरून माहिती मिळवू शकता.