Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आतुरता ओलाच्या इलेक्ट्रिक वाहनांची, पुढच्या वर्षापर्यंत स्वस्त आणि मस्त ओला ई-गाड्या!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Ola's cheap and cool e-V coming next year

मुक्तपीठ टीम

सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढताना दिसत आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅब-एग्रीगेटर-टर्न-इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील त्यांचा स्टार्टअप पुढील वर्षापासून स्वस्त इलेक्ट्रिक मोटरसायकल आणि इलेक्ट्रिक स्कूटर विकसित करण्यास सुरवात करेल. अग्रवाल यांनी यापूर्वी एका ब्लॉग पोस्टमध्ये नमूद केले होते की, कंपनी आपली ईव्ही रेंज ई-स्कूटर्सपासून ई-बाईक आणि ई-कारपर्यंत विस्तारित करण्याची योजना आखत आहे.

 

इलेक्ट्रिक बाईक आणि परवडणाऱ्या ई-स्कूटर्सवर ओलाने लक्ष केंद्रित केले आहे. अग्रवाल यांनी इलेक्ट्रिक मोटरसायकल आणि स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरच्या उत्पादनाविषयीच्या बातम्यांचे पोस्ट रिट्विट करत “हो पुढच्या वर्षी” असे लिहिले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला, ओला इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक मोटारसायकल आणि कार विकसित करण्याच्या आपल्या योजनांना गती देण्यासाठी २०० दशलक्ष जमा केले.

 

निधी उभारणी हे ईव्ही स्टार्टअपचे ‘मिशन इलेक्ट्रिक’-

  • नो पेट्रोल २डब्ल्यू इन इंडिया २०२५ ला फास्ट ट्रॅक करण्याच्या योजनेचा हा एक भाग आहे.
  • कंपनीचा अंदाज आहे की, दशकाच्या मध्यापर्यंत पेट्रोलवर चालणारी एकही दुचाकी देशातील रस्त्यावर धावणार नसेल.

 

बॅटरीने चालणारी ओलाची पहिली स्कूटर

  • ओलाने एस१/ एस२ लॉन्च केली आणि सध्या हे मॉडेल दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता आणि अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये चाचणी ड्राइव्हसाठी ऑफर केले जात आहे.
  • चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून अनेक लोक ज्यांनी युनिट आरक्षित केले आहे ते खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी त्याची चाचणी करू शकतील. चाचणी राइड संपल्यानंतर लवकरच डिलिव्हरीची पहिली बॅच सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.
  • ओला इलेक्ट्रिक स्कूटर एस१ आणि एस२ प्रो या दोन ट्रिममध्ये उपलब्ध आहे.
  • ओला एस१ ची किंमत १ लाख आहे आणि एका चार्जवर सुमारे १२० केएमएस असा दावा केला जातो.
  • तर एस१ प्रोची किंमत १ लाख ३० हजार आहे आणि एका चार्जवर १८० किलोमीटरचा दावा केला जातो.

पाहा व्हिडीओ: 


Tags: electric vehicleIndialatest takemuktpeethola electric scooterOla evओला इलेक्ट्रिक स्कूटरभारतमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

शालेय शिक्षणात सुधारणांसाठी ग्लोबल आयटी कंपन्यांसह शैक्षणिक तंत्रज्ञान मंच

Next Post

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ९० जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
भारतीय विमानतळ प्राधिकरण

भारतीय विमानतळ प्राधिकरणात ९० जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!