मुक्तपीठ टीम
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात म्हणजेच ओएनजीसीत ट्रेड अॅंड टेक्निशियन या पदासाठी उत्तर विभागात २०९ जागा, मुंबई विभागात ३०५ जागा, पश्चिम विभागात १ हजार ४३४ जागा, पूर्व विभागात ७४४ जागा, दक्षिण विभागात ६९४ जागा, मध्य विभागात २२८ जागा अशा एकूण ३ हजार ६१४ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पदवीधर अॅप्रेंटिस- बी.कॉम/ बीए/ बीबीए
- ट्रेड अॅप्रेंटिस- आयटीआय (स्टेनोग्राफी-इंग्रजी/ सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/ कोपा/ ड्राफ्ट्समन/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ आयसीटीएसएम/ लॅब असिस्टंट/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/ मशिनिस्ट/ मेकॅनिक मोटर व्हेईकल/ मेकॅनिक डिझेल/ प्लंबर/ सर्व्हेअर/ वेल्डर
- टेक्निशियन अॅप्रेंटिस- सिव्हिल/ कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट https://www.ongcindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: