मुक्तपीठ टीम
मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये एक वर्षांच्या अॅप्रेंटिसशिपसाठी इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोप्लेटर, मरीन इंजिन फिटर, फाउंड्रीमन, पॅटर्न मेकर, मेकॅनिक डिझेल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट, मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स, पेंटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, मेकॅनिक एसी, टेलर जनरल, वेल्डर जी अॅंड ई, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, शिपराईट वुड, फिटर, मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर, आय अॅंड सीटीएसएम ही पदं आहेत तर, दोन वर्षांच्या अॅप्रेंटिसशिपसाठी, शिपराईट स्टील, रिगर, फोर्जर आणि हीट ट्रीटर या पदांसाठी एकूण ३३८ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०८ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- रिगर- ०८वी उत्तीर्ण
- फोर्जर आणि हीट ट्रीटर- १०वी उत्तीर्ण
- उर्वरित पदं- १) ५०% गुणांसह १०वी उत्तीर्ण २) ६५% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.indiannavy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.