Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिला आयोगाकडे रुपाली चाकणकरांवरील अश्लील कमेंटची तक्रार!

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
Rupali Chakankar

हेरंब कुलकर्णी / व्हा अभिव्यक्त!

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मा.रुपाली चाकणकर यांच्याकडे मी त्यांच्यावरच्या अश्लील कमेंटची तक्रार करतो आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची काल मी वटपौर्णिमेला वडाला जात नाही अशा प्रकारची एक भूमिका आली. त्यांच्या एका भाषणाच्या आधारे ती पोस्ट बनवली गेली. त्यात त्यांनी महिलांनी वटपौर्णिमेला जाऊ नये असे कुठेही म्हटलेले नाही, फक्त मी स्वतः जात नाही हे सांगितले व त्याच वेळी सत्यवानाची सावित्री समाजाला लवकर कळली. सावित्रीबाई अजून कळत नाही किंवा कळायला हवी अशी भावना व्यक्त केली.

यात खटकण्यासारखे काहीच नव्हते. लोकानुरंजी भूमिका राजकीय पक्ष घेत  असताना त्यांनी गोलमाल न बोलता अतिशय धाडसाने हे मांडले. हे अपवादात्मक व कौतुकास्पद आहे.
त्यांच्या वेगवेगळ्या पोस्ट खालच्या कमेंट आवर्जून बघितल्या तेव्हा अक्षरशः लाज वाटली. मला ते टाकताना लाज वाटते आहे पण अतिशय अश्लील भाषेत अनेक कमेंट आहे.

विशेष म्हणजे रूपाली चाकणकर यांचे घटनात्मक पद व तात्काळ कारवाईच्या शिफारस करू शकणारे पद असल्याने त्या सर्व विकृत व्यक्तींवर लगेच कारवाई होऊ शकते, हे माहीत असूनही अशा कमेंट करण्याची हिंमत केली याचा अर्थ सोशल मिडियावर स्त्रियांच्याबाबत हिम्मत किती वाढली आहे याचे हे त्याचे उदाहरण आहे.

अमृता फडणवीस यांच्या भूमिका मान्य असो किंवा नसो त्यांच्याबाबतीत अशाच अत्यंत अश्लील भाषेत कमेंट फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून सुरु आहे.

तेव्हा आता महिला आयोगाच्या अध्यक्षावरच नीच अश्लील कमेंटबाबत मी त्यांनाच पत्र लिहितो आहे व सोशल मीडियावर काल त्यांच्याबाबत जे घडले त्यावर त्यांनीच अध्यक्ष या नात्याने त्यांच्यातील स्त्रीबाबत सायबर सेलला कारवाईचे आदेश द्यावी अशी मागणी करणार आहे.

त्याचबरोबर सायबर सेलने इथून पुढे कोणत्याही महिलांवर अशा कमेंट केल्या तर सु मोटो कारवाई करावी असे आदेश त्यांनी देण्याची गरज आहे.

पुरुष म्हणून मी मागील वर्षी वटसावित्रीवर टीका केली तर मला फक्त पुरोगामी म्हणून शिव्या दिल्या पण एक स्त्री टीका करते. तेव्हा थेट अश्लील शेरेबाजी होते ही विकृती रोखायला हवी.

महिला आयोगाला आज लिहिलेले पत्र:

मा. रुपाली चाकणकर

अध्यक्ष, महिला आयोग

विषय: रुपाली चाकणकर नावाच्या महिलेवर झालेल्या अश्लील शेरेबाजीवर महिला आयोग अध्यक्ष म्हणून कारवाई करणेबाबत

महोदय,

तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात परंतु वटपौर्णिमेनिमित्त तुम्ही जी पोस्ट लिहिली त्यावर काहीजणांनी एक महिला म्हणून अत्यंत अश्लील शेरेबाजी केली आहे. घटनात्मक पदावर असलेल्या एका महिलेवर की जी कायदेशीर कारवाईची शिफारस करू शकते. अशा महिलेवर जर असे लिहिण्याची हिंमत होत असेल तर इतर महिलांवर सोशल मिडीयावर काय होत असेल याची कल्पना यावी.

मागील आठवड्यात अमृता फडणवीस यांनी वेश्याव्यवसायावर मत मांडले (की जे मला अजिबात मान्य नाही) त्यावर ज्या नीच भाषेत शेरेबाजी झाली व आता तुमच्यावर शेरेबाजी झाली. तेव्हा हा विषय व्यक्तिगत न समजता सायबर सेलकडून अमृता फडणवीस व तुम्ही अशा दोघींवर झालेल्या सर्व कमेंट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत त्यातून पुन्हा अशी हिंमत कोणी करणार नाही.

एका घटनात्मक पदावर असलेल्या महिलेबाबत असे अश्लील कमेंट करूनसुद्धा जर कारवाई झाली नाही तर इतर महिलांना सोशल मिडीयावर लिहिणेच मुश्कील होईल हे लक्षात घेऊन तत्काळ कारवाई सुरु करावी ही विनंती

हेरंब कुलकर्णी संपर्क क्रमांक ८२०८५८ ९ १ ९ ५
श्री. हेरंब कुलकर्णी


Tags: Heramb Kulkarnirupali chakankarVha Abhivyaktमहाराष्ट्र राज्य महिला आयोगरुपाली चाकणकरवटपौर्णिमाव्हा अभिव्यक्तहेरंब कुलकर्णी
Previous Post

मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये ३३८ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

कोल्हापूरचा बेंदूर

Next Post
कोल्हापूरचा बेंदूर

कोल्हापूरचा बेंदूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!