मुक्तपीठ टीम
नाशिकच्या ओझर शहरात भारतीय हवाई दलात मशिनिस्ट या पदासाठी ०४ जागा, शीट मेटल या पदासाठी ०७ जागा, गॅस अॅंड इलेक्ट्रिक वेल्डर या पदासाठी ०६ जागा, रेडिओ रडार एअरक्राफ्ट मेकॅनिक या पदासाठी ०९ जागा, कारपेंटर या पदासाठी ०३ जागा, इलेक्ट्रिशियन एअरक्राफ्ट या पदासाठी २४ जागा, पेंटर जनरल या पदासाठी ०१ जागा अशा एकूण ८० जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) ५०% गुणांसह १०वी आणि १२वी उत्तीर्ण २) ६५% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या अॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १४ ते २१ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या अॅप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट https://indianairforce.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.