Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अबब..! उंदीर मारण्यासाठी मुंबई पालिकेने केले १ कोटी खर्च!

भाजपाचा करदात्यांच्या पैशांच्या उधळपट्टीवर भाजपाचा आक्षेप

February 12, 2022
in घडलं-बिघडलं
0
Mumbai Municipal Corporation spent Rs 1 cr for rat killing

मुक्तपीठ टीम

मुंबई पालिकेने उंदीर मारण्यासाठी केलेल्या १ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावावर भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत जोरदार आक्षेप घेतला. सत्ताधारी शिवसेनेने केलेला ‘मूषक खर्च’ म्हणजे सर्वसामान्य करदात्या मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी असल्याची घणाघाती टीका गटनेते शिंदे यांनी केली. शिवसेनेने घोटाळा करण्याची एकही जागा शिल्लक ठेवली नसल्याचे सांगत गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समिती अध्यक्षांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

 

उंदीर मारण्याच्या प्रस्तावात कोणतीही स्पष्टता नाही. १२ प्रशासकीय विभागात उंदीर मारण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली आहे. प्रस्तावामध्ये किती उंदीर मारले? त्यांची विल्हेवाट कशी लावली? त्यांची उत्पत्तीस्थाने काय होती ? कायमस्वरूपी नेमक्या उपायोजना काय केल्या? त्याची कुठलीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. गेली अनेक दिवस मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ६९ (क) आणि कलम ७२ अंतर्गत महापौर, महापालिका आयुक्त जो खर्च करतात त्यामध्ये वारंवार त्रुटी आढळून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने अनेकवेळा त्रुटी दाखवून दिल्या आहेत. त्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासनाने त्याबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे. तरीही वारंवार आर्थिक बाबींशी संबंधित या कलमांचा फायदा घेऊन सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी केली जात असून भारतीय जनता पक्षाचा याला तीव्र विरोध असून प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला.


Tags: BJPMumbai municipalprabhakar shindeRat KillingShivsenaप्रभाकर शिंदेभाजपामुंबई पालिकाशिवसेना
Previous Post

नाशिकमध्ये भारतीय हवाई दलात ८० अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

‘स्किन टू स्किन स्पर्श’ वादग्रस्त निकाल देणाऱ्या न्या. पुष्पा गनेडीवालांचा राजीनामा!

Next Post
Pushpa Ganediwala

'स्किन टू स्किन स्पर्श' वादग्रस्त निकाल देणाऱ्या न्या. पुष्पा गनेडीवालांचा राजीनामा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!