मुक्तपीठ टीम
भारत पेट्रोलियममध्ये केमिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ आयटी/ कॉम्प्युटर सायन्स/ इंस्ट्रूमेंटेशन/ मेकॅनिकल या विषयात ४२ जागांवर पदवीधर अॅप्रेंटिसशिप तर, केमिकल/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ आयटी/ इंस्ट्रूमेंटेशन/ मेकॅनिकल या विषयात ४५ जागांवर डिप्लोमा अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. अशा एकूण ८७ जागांसाठी ही अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पदवीधर अॅप्रेंटिस- ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी
- डिप्लोमा अॅप्रेंटिस- ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारत पेट्रोलियमच्या अधिकृत वेबसाइट https://www.bharatpetroleum.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
http://portal.mhrdnats.gov.in/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1YHSns7be2gDsxnhwrAeGgUc1p9N3rSqb/view