मुक्तपीठ टीम
अॅपलने त्यांचे उत्पादन भारतात सुरु केले आहे. आता अॅपलने एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचे उत्पादन चीनमधून भारतात हलवण्यास सांगितले आहे. एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचे उत्पादनही भारतात सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. आयफोनची निर्मिती भारतात आधीच सुरू आहे.
आयफोन १४ चे उत्पादन भारतात सुरु…
- अॅपलने भारतात आयफोन १४ चे उत्पादन सुरू केले आहे.
- लवकरच मेक इन इंडिया आयफोन १४ युरोपमध्ये निर्यात केला जाईल.
- चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपासून भारतातील लोकांना स्वदेशी बनावटीचा आयफोन १४ मिळण्यास सुरुवात होईल.
- कंपनी पुढच्या वर्षी चीन आणि भारतात एकाच वेळी आयफोन १५ चे उत्पादन सुरू करू शकते.
- या वर्षाच्या अखेरीस आयफोन १४ भारतात पाच टक्के बनवले जातील.
- २०२५ पर्यंत ही संख्या २५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
पाच महिन्यांत १ अब्ज डॉलर किमतीच्या आयफोनची निर्यात…
- एप्रिलपासून पाच महिन्यांत भारतातून आयफोनची निर्यात १ अब्ज डॉलर ओलांडली आहे.
- भारतात बनवलेले आयफोन प्रामुख्याने युरोपात पाठवले जात आहेत.
- मार्च २०२३ पर्यंत हा आकडा २.५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो.
- मार्च २०२२ पर्यंत भारताने निर्यात केलेल्या १.३ अब्ज डॉलर आयफोनच्या तुलनेत हे जवळपास दुप्पट आहे.
- आयफोनच्या एकूण उत्पादनापैकी फक्त एक छोटासा भाग भारतात तयार होतो.
- चीनमध्ये २३० दशलक्ष आयफोन बनवले जातात, तर भारतात बनवलेल्या आयफोनची संख्या केवळ ३ दशलक्ष आहे.
- फॉक्सकॉन भारतात बीट्स हेडफोन बनवण्याच्या तयारीत आहे
- आयफोन असेंबलर फॉक्सकॉन भारतात बीट्स हेडफोन बनवण्याच्या तयारीत आहे.
- त्यानंतर एअरपॉड्सची निर्मिती भारतातही होऊ शकते.
- आयफोननंतर अॅपलच्या उत्पादनांमध्ये एअरपॉड्स हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
- सध्या व्हिएतनाम आणि चीनमध्ये एअरपॉड्सचे उत्पादन केले जात आहे.
- तर बीटचे सर्वाधिक उत्पादन व्हिएतनाममध्ये होते.