मुक्तपीठ टीम
लोकांना ब्रँडेड प्रोडक्ट विकत घ्यायला आवडतात. अॅपल स्मार्टवॉच सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. अॅपल स्मार्टवॉचमधील SOS च्या नवीन अपडेटमुळे एका मुलाचा जीव वाचला आहे. दरीत पडल्याने त्याचा आयफोन हरवला पण अॅपल स्मार्टवॉचच्या मदतीने त्याने कुटुंब आणि मित्रांशी संपर्क साधत स्वत:चा जीव वाचवला. चला जाणून घेवूया स्मितच्या संघर्षाची कथा…
नेमक काय घडलं होत?
- स्मित मेहता हा लोणावळाला राहतो.
- स्मित त्याच्या मित्रांसोबत गिर्यारोहणासाठी गेला होता.
- पावसामुळे परतत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत पडला.
- एका मोठ्या दगडात आणि झाडात अडकल्याने तो वाचला.
- त्याचा आयफोनही हरवला.
- स्मितने अॅपल वॉच घातला होता.
- अॅपल वॉचच्या मदतीने त्याने इतरांशी संपर्क साधला.
- त्याने त्याचे ठिकाण सांगितले.
- स्मितला त्याचे मित्र आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
- त्याला कोणतीही इजा झालेली नाही फक्त त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
- तो सध्या काठीच्या सहाय्याने चालत आहे.
- अॅपल वॉचमध्ये सापडलेल्या एसओएस फिचरच्या मदतीने जीव वाचवण्याची आणि मदत पुरवण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
- जर अॅपल वॉच नसता तर त्याला खूप वेळ प्रतीक्षा करावी लागेल.
स्मितचे अॅपलच्या सीईओंना ईमेलद्वारे घटनेचे स्पष्टीकरण…
- अपघातातून सावरल्यानंतर, स्मितने अॅपलचे सीईओ टिम कुक यांना ईमेल पाठवून घडलेली घटना सविस्तर सांगितली.
- अॅपलच्या प्रोडक्टमुळे आज तो कसा वाचला.
- त्याच्या ईमेलला उत्तर देताना, टीम कुकने देखील प्रतिक्रिया दिली आहे आणि स्मितनी घटना सांगितल्याबद्दल त्याचे आभार मानले.