मुक्तपीठ टीम
फोल्डेबल स्मार्टफोनची मागणी जगभरात वाढत आहे. फोल्डबल स्मार्टफोनमध्ये बाजारात सॅमसंग ही एक आघाडीची स्मार्टफोन कंपनी म्हणून उदयास आली आहे. पण सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी लवकरच नवीन फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात याणार आहे, प्रीमियम स्मार्टफोन निर्माता अॅपलकडून फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी सुरू झाली आहे. अॅपलने फोल्डेबल आयफोन स्क्रीनच्या प्रोटोटाइपची चाचणी सुरू केली आहे. आयफोन १२ मॉडेल पहिल्या चाचणीत उत्तीर्ण झाल्याचीही माहिती आहे.
टच आयडीचे समर्थन मिळेल
अॅपलने फोल्डेबल आयफोनच्या स्क्रीन प्रोटोटाइपच्या चाचणीस मान्यता दिली आहे. परंतु आयफोनच्या याच प्रोटोटाइपने कंपनी पुढे जाईल की नाही हे अद्याप ठरलेले नाही. तसेच, फोल्ड करण्यायोग्य आयफोनचा प्रोटोटाइप २०२१ मधील लाइनअपमध्ये समाविष्ट होईल की नाही हे देखील अजून ठरले नाही. अॅपल आयफोन मॉडेलच्या नवीन लाइनअपच्या डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनिंग आणि टच आयडी समर्थित करणार आहे.
फोनमध्ये काय खास असेल
अलीकडच्या काळात अॅपलने फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोन डिझाइनसाठी अनेक पेटंट दाखल केले आहेत. मागील वर्षी, कंपनीने फोल्डेबल स्मार्टफोन हिंज साठी मंजुरी दिली आहे. हे हिंज स्क्रीनच्या तळाशी असेल. फोल्डेबल स्मार्टफोनच्या डिझाइनमध्ये स्क्रीन मधोमध फोल्ड केली जाऊ शकते.
अॅपलच्या फोल्डेबल फोनच्या प्रोटोटाइपनुसार फोनची स्क्रीन सध्याच्या आयफोन मॉडेलच्या ६.७ इंचाच्या स्क्रीनपेक्षा मोठी असेल.