Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! ऑनलाइन शॉपिंगची घाई…ऑफरचा मोह टाळा…महिलांची फसवणूक करणारी वेबसाइट!

January 18, 2021
in कायदा-पोलीस
0
online shopping

मुक्तपीठ टीम

 

महिलांनो……. ऑनलाइन शॉपिंग करता तर सावधान, बोगस वेबसाइटच्या माध्यमातून तुमची फसवणुक होण्याची शक्यता आहे. “शॉपि डॉट कॉम” या नावाने बोगस वेबसाइट बनवून देशभरातील २२ हजार महिलांना सुमारे ७० लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आशिष अहिर या मुख्य आरोपीस गुजरातच्या सुरत शहरातून मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे, त्यामुळे अनेकजण ऑनलाइन ऑर्डर करण्यावर भर देतात, त्याचाच काही सायबर भामट्यांनी फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर “Shopiiee.com” या वेबसाइटने स्वत:ची जाहिरात केली होती. त्यातून या वेबसाइटची प्रचंड लोकप्रियता वाढली. त्यामुळे देशभरातून अनेक महिलांनी या वेबसाइटवर ड्रेस मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी, गृहपयोगी वस्तू मागवल्या होत्या. वस्तू मागवताना आधी पेमेंट करणे गरजे असल्याने त्यांनी पेमेंटही केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत संबंधित अधिकार्‍यांकडून त्यांच्या मागवलेल्या वस्तूंच्या डिलीव्हरीची पूर्तता झाली नव्हती, अशा अनेक तक्रारी पोलिसांत येऊ लागले होत्या. यासंदर्भात काही तक्रारी सायबर सेल पोलिसांना प्राप्त झाल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. प्राथमिक तपासात पोलिसांना या वेबसाइटवरुन देशभरातील २२ हजार महिलांनी ऑनलाइन ऑर्डर देताना सुमारे ७० लाख रुपयांचे पेमेंट केल्याचे उघडकीस आले होते, मात्र पेमेंट करुनही त्यापैकी एकाही महिलेला त्यांच्या ऑर्डरची डिलीव्हरी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सायबर गुन्हे शाखेच्या तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध ४१९, ४२० भादवी सहकलम ६६ क, ६६ डी आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

 

तपासादरम्यान संबंधित आरोपी गुजरातच्या सुरत शहरात वास्तव्यास असून त्यानेच ही बोगस वेबसाइट बनवून अनेक महिलांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते, त्यानंतर या पथकाने सुरत शहरातून आशिष अहिर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने “Shopiiee.com” नावाचे बोगस वेबसाइट बनविल्याची कबुली दिली. आशिष हा संगणकतंज्ञ असून त्याने विदेशातून शिक्षण घेतले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाईल, तीन सिमकार्ड, आयसीआयसीआय बँकेचे धनादेश जप्त केले आहेत. त्याच्या चौकशीत त्याने या वेबसाइटसह इतरही काही बोगस वेबसाइट तयार केल्याचे सांगितले. आतापर्यंत त्याने अकरा बोगस वेबसाइट बनवून त्याद्वारे अनेकांची फसवणुक केली आहे. या अकरा वेबसाइटची माहिती काढण्याचे काम सुरु असून त्या वेबसाइटच्या माध्यमातून आतापर्यंत किती लोकांची किती रुपयांची फसवणुक झाली आहे याचा पोलीस तपास करीत आहेत. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

आशिषने ज्या अकरा बोगस वेबसाइट तयार केल्या आहेत, त्या पुढीप्रमाणे आहेत.

१) https://white-stones.in/,

२) https://jollyfashion.in/,

३) https://fabricmaniaa.com/,

४) https://takesaree.com/,

५) https://www.assuredkart.in/,

६) https://republicsaleoffers.myshopify.com/,

७) https://fabricwibes.com/,

८) https://efinancetix.com/,

९) https://www.thefabricshome.com/,

१०) https://thermoclassic.site/,

११) https://kasmira.in/

 


Tags: online shoppingonline shopping fraudWebsiteऑनलाइन शॉपिंगवेबसाइट
Previous Post

अ‍ॅपल आता सॅमसंगच्या वाटेवर…आयफोनसाठी फोल्डेबल स्क्रीनची चाचणी!

Next Post

पुण्यातील ज्यू धर्मीय बांधवांचा भाजपमध्ये प्रवेश

Next Post
Jewish

पुण्यातील ज्यू धर्मीय बांधवांचा भाजपमध्ये प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!