Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात

January 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
whatsapp

मुक्तपीठ टीम

 

व्हॉट्सअॅपने जाहीर केलेली नवी प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याच्या निर्देशासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेनुसार हे धोरण कायद्यांचे उल्लंघन आहे आणि यामुळे देशाच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दाखल केलेल्या या याचिकेमध्ये केंद्र सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आणि व्हॉट्सअ‍ॅप लिंक, फेसबुक लिंक आणि फेसबुक इंडिया ऑनलाइन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या मोठ्या तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांच्या नियमनासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासही सांगितले आहे.

तसेच याचिका दाखल करणारे विवेक नारायण शर्मा यांना, ही याचिका दाखल करणे आवश्यक झाले कारण केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या गोपनीयतेचे, स्वतंत्र्यपणे बोलण्याचे आणि अभिव्यक्ती हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडण्यास अपयशी ठरले असल्याचे म्हटले आहे.

 

तर दुसरीकडे, भारतातील बाजारपेठ घसरल्याचे पाहून व्हॉट्सअ‍ॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी पुढे ढकलली आहे. त्यामुळे भारतात ८ फेब्रुवारीला लागू होणारी प्रायव्हसी पॉलिसी आता १५ मे ला करण्यात येणार आहे.

 

व्हॉट्सअ‍ॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यानंतर, व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचा डेटा फेसबुकबरोबर शेअर करत असल्याचा आरोप होत आहे. यामुळेच युजर्स व्हॉट्सअ‍ॅपला रामराम ठोकून दुसरा पर्याय शोधत आहेत. मात्र, कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप २०१६ पासून आपल्या ग्राहकांचा फक्त मूळ डेटा फेसबुकवर शेअर करत आहे. या माहितीमध्ये यूजर्स ओला-उबर बूक करण्यासाठी माहिती देतो तेवढीच माहिती व्हॉट्सअॅप फेसबुकला देतो.

 

तसेच व्हॉट्सअॅप कंपनीचा असा दावा आहे की, नवीन प्रायव्हसी पॉलिसीअंतर्गत वापरकर्त्यांशी संवाद, लोकेशन किंवा इतर काहीही फेसबुक किंवा इतर कोणाशीही शेअर केले जाणार नाही असे सांगितले जाते. पण ज्यावेळी एखादा युजर मेक माय ट्रिपवरून तिकीट बूक करतो आणि ते तिकीट आपण व्हॉट्सअॅपवरून पाठवतो. तेव्हा मेक माय ट्रिप बिजनेस सर्विस प्रोव्हायडरच्या रुपात काम करते. या कंपनीला जेवढा डेटा पाठवला जातो. तेवढाच डेटा फेसबुकला शेअर केला जातो.


Tags: Whatappव्हॉट्सअॅपव्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसी
Previous Post

औरंगाबादच्या ‘संभाजी नगर’ नामकरणास संभाजी ब्रिगेडचे समर्थन

Next Post

अ‍ॅपल आता सॅमसंगच्या वाटेवर…आयफोनसाठी फोल्डेबल स्क्रीनची चाचणी!

Next Post
foldabile iphone

अ‍ॅपल आता सॅमसंगच्या वाटेवर...आयफोनसाठी फोल्डेबल स्क्रीनची चाचणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!