मुक्तपीठ टीम
अॅपलचे बाजारमूल्य ३ ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले आहे. हे बाजारमूल्य भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा खूप जास्त आहे. भारताच्या जीडीपीबद्दल बोलायला झाले, तर तो सुमारे २.६५ ट्रिलियन डॉलर आहे. मात्र सोमवारी २०२२च्या पहिल्या ट्रेंडिग सत्रात अॅपलच्या बाजार मूल्याने इतिहास रचला. ते प्रथमच 3 ट्रिलियन डॉलर म्हणजेच सव्वा दोन लाख अब्ज रुपयांच्या पार गेले आहे. आयफोन बनवणाऱ्या अॅपलचे बाजारमूल्य सोमवारी यू.एस. बाजारात किंचित घसरण होण्यापूर्वी स्टॉक ३ ट्रिलियन डॉलरच्या विक्रमी पातळीवर गेले होते.
जगभरातील इलेक्ट्रिक उत्पादनांना मोठी मागणी असताना, महामारीच्या काळात अॅपलने ऑगस्ट २०२० मध्ये २ ट्रिलियन डॉलर बाजार मूल्याचा टप्पा गाठला. कंपनीला त्याच्या मूल्यांकनात आणखी १ ट्रिलियन डॉलर जोडण्यासाठी फक्त १६ महिने लागले. अॅपल १९८० पासून अमेरिकन स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहे. स्टीव्ह जॉब्सच्या कार्यकाळात, १९९७ ते २०११, अॅपलने सतत नवीन उंची गाठली. आता टीम कुकच्या नेतृत्वाखालीही कंपनीच्या शेअर्सच्या किमती सातत्याने नवीन उंची गाठत आहेत.
भारत-ब्रिटनच्या जीडीपीपेक्षा अॅपलचं बाजारमूल्य जास्त!
- अॅपलने ही एक कंपनी आहे, पण तिचं विक्रमी उंचीवर काही वेळ पोहचलेलं बाजारमूल्य हे युरोपियन शेअर बाजारातील सर्व कंपन्यांच्या बाजारमूल्यांपेक्षा जास्त आहे.
- एवढेच नव्हे तर अॅपलने हे महायश मिळवत भारत आणि ब्रिटन या देशांच्या अर्थव्यवस्थांनाही मागे टाकले आहे.
- ३ ट्रिलियनची कंपनी बनल्यानंतर अॅपलचे बाजारमूल्य भारत आणि ब्रिटनच्या नॉमिनल जीडीपीपेक्षा जास्त झाले आहे.
- इतकेच नाही तर अॅपलचे बाजार मूल्य भारताच्या अर्थव्यवस्थेच्या एकूण आकारापेक्षा जास्त आहे.
- तसेच ते जर्मनीच्या एकूण अर्थव्यवस्थेच्याही जवळ पोहचत आहे.