मुक्तपीठ टीम
आयफोन एसई या अॅपलच्या स्वस्त 5G फोनच्या प्री-बुकींगला भारतात सुरवात झाली आहे. हा फोन कंपनीच्या ऑफिशियल साइटवर आणि फ्लिपकार्डवर प्री बुकींग केला जाऊ शकतो. उत्सुकता लागलेल्या या फोनची विक्री १८ मार्च पासून सुरू करणार केली जाणार आहे. तसेच फोनची डिलिव्हरी मार्चच्या उत्तरार्धात सुरू होईल. हा आयफोन हा मिडनाइट,स्टारलाइट आणि लाल या तीन कलरमध्ये उपलब्ध होणार आहे.
आयफोन एसईची किंमत
- ६४ जीबी स्टोरेज वेरियंट असणारा आयफोन एसई स्मार्टफोन ४३,९०० रूपयेमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
- तसेच फोनच्या किंमतीत पॅकींग चार्जचाही समावेश आहे.
- ग्राहकांना पॅकींग चार्जसाठी ४९ रूपये वेगळे द्यावे लागतील.
- त्यासोबतच कंपनी,विक्री झालेल्या प्रत्येक आयफोन एसईच्या नफ्यातील काही भाग हा कोवीड-१९ फंडात ट्रान्सफर करणार आहे.
- आयफोन एसईच्या १२८ जीबी वेरियंटची किंमत ४८,९०० रूपये आहे.
- तसेच २५६ जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत ५८,९०० रूपये आहे.
- आयफोन एसई स्मार्टफोन,एसबीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून १० टक्के डिस्काउंटवर खरेदी केला जाऊ शकतो.
- फ्लिपकार्ड अॅक्सिस बॅंक ऑफरमध्ये फोनला ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक ऑफर दिली जात आहे.
- फोन हा १,५३८ रूपये प्रतिमहिने ईएमआय ऑप्शनवर खरेदी केला जाऊ शकतो.
- आयफोन एसईच्या खरेदीवर १३,००० रूपये एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
आयफोन एसईचे स्पेसिफिकेशन
- आयफोन एसईमध्ये ४.७ इंचचा रेटिना एचडी डिस्प्ले दिलेला आहे.
- फोन हा आयओएस १५ वर चालतो.
- फोनमध्ये ६ एनएम बेस्ड ए१५ बायोनिक चिपसेट दिली गेली आहे.
- सेल्फीसाठी फोन फेसटाइम एचडी कॅमेरा ऑफर करणार आहे.
- कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये,ब्लूटूथ वर्जन५, 5G, वायफाय५, ४जी वोल्ट, जीपीएस, ए-जीपीएस,एनएफसी आणि लायटनिंग पोर्ट दिलेला आहे.