मुक्तपीठ टीम
होंडा हायनेस ३५० ला भारतीय बाजारपेठेत लाँच होऊन १ वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने या बाईकची नवी अॅनिवर्झरी एडिशन लाँच करण्यात आली आहे. या नव्या एडिशनचे बुकिंगही सुरु करण्यात आले आहे.
नव्या आवृत्तीतील वैशिष्ट्य
- इग्नियस ब्लॅक आणि मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक या २ रंगात उपलब्ध आहेत.
- होंडा हायनेसला अनेक नवीन आणि आकर्षक फीचर्स देण्यात आली आहेत.
- हायनेस ३५० इतर सीसी बाईक्सपेक्षा खूप वेगळी आणि अपडेटेड आहे.
- याचा क्लासिक लूक तरुणाईला आवडेल असा आहे.
- रेट्रो बाइक ड्युअल टोन बॉडी पेंट, ड्युअल क्रोम फिनिश हॉर्न, स्प्लिट एलईडी हेडलाइट, एलईडी टेललॅम्प, एलईडी टर्न इंडिकेटर, क्रोम फिनिश फ्रंट आणि रियर मडगार्ड आणि क्रोम फिनिश सायलेन्सर आहे.
- यामध्ये ३४८.३६ सीसी सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे.
- जे २०.८ bhp पॉवर आणि ३० Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यात ५ स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहे.
होंडा हायनेस CB३५० ची किंमत १,९२,४१1 रुपये आहे. ही बाईक DLX आणि DLX Pro या दोन प्रकारांमध्ये विकली जात आहे.