Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेच्या ‘कायदा’ चाणक्याचा न्यायालयीन डाव! आता सोमय्या काय करणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
ka

मुक्तपीठ टीम

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अॅड. अनिल परब आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यातील सामना सध्या रंगला आहे. शिवसेनेच्या या कायदा चाणक्याने त्यांच्यावर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांविरोधात केलेला १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा वाटतो तेवढा सोपा जाणार नाही, असे कायदे क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे आजवर इतरांना अडचणीत आणणारे किरीट सोमय्या आता त्याला कसे तोंड देतात, तेथे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

 

शिवसेनेचे ‘कायदा’ चाणक्य!

  • अॅड. अनिल परब हे शिवसेनेचे त्यातही ठाकरे कुटुंबियांच्या सर्व कायदेशीर व्यवहारांचीही जबाबदारी विश्वासाने सोपवली जाते.
  • शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूपत्राच्या वादावर ठाकरे कुटुंबात सन्मानानं तोडगा निघाला होता.
  • दिवंगत शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्रासारख्या खासगी बाबींपासून दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत आणलेल्या नगरसेवकांच्या कायदेशीर पुनर्वसनापर्यंत कायदेशीर कामे ते हाताळतात.
  • मनसेपासून इतरही काही पक्षांतराची कामे त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसवून तडीस नेली, त्यामुळए मुंबई मनपात भाजपासून दोन जागांनी पुढे असणारी शिवसेना मोठ्या फरकाने पुढे गेली.

 

अनिल परब यांनी ७२ तासांची मुदत देऊन किरीट सोमय्यांविरोधात दावा दाखवल केला आहे. न्यायालयाने याची दखल घेतली आणि येत्या २३ डिसेंबर पर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना आदेश दिले आहेत. किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्या मानहानीप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. अनिल परब यांनी ट्विट करत लिहिले आहे की, “किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी आणि मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु, त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.”

 

सध्या आक्रमक भूमिका बजावणाऱ्या सोमय्यांवर आता बाजी पलटताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा तसेच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. पण आता परब यांनी त्यांच्या विरूद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

 

परबांच्या दाव्याला भिक घालत नाही – सोमय्या

  • अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नाही.
  • आता शिवसेनेला असे वाटणार नाही की फक्त आमचेच घोटाळे बाहेर काढतात.
  • कोट्यवधी रुपयांचे घोटाळे बाहेर येणार आहे.
  • लवकरच राष्ट्रवादीच्या परिवारातील एक मोठा घोटाळा बाहेर येणार आहे.

Tags: Anil ParabBJPKirit SomaiyamuktpeethShivsenaअनिल परबकिरीट सोमैयान्यायालयभाजपामुक्तपीठशिवसेना
Previous Post

पंतप्रधान मोदींनी केले जलजीवन मिशन अॅप लाँच! “पाणी प्रसादासारखं वापरा!”

Next Post

“महाराष्ट्र सरकार जागा देईल तिथे लॉजिस्टिक पार्क, इंडस्त्रियल क्लस्टर्स, ट्रांसपोर्ट नगर उभारणार!”: नितीन गडकरी

Next Post
nitin gadkari

"महाराष्ट्र सरकार जागा देईल तिथे लॉजिस्टिक पार्क, इंडस्त्रियल क्लस्टर्स, ट्रांसपोर्ट नगर उभारणार!": नितीन गडकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!