मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अॅड. अनिल परब आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यातील सामना सध्या रंगला आहे. शिवसेनेच्या या कायदा चाणक्याने त्यांच्यावर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यांविरोधात केलेला १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा वाटतो तेवढा सोपा जाणार नाही, असे कायदे क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे आजवर इतरांना अडचणीत आणणारे किरीट सोमय्या आता त्याला कसे तोंड देतात, तेथे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
शिवसेनेचे ‘कायदा’ चाणक्य!
- अॅड. अनिल परब हे शिवसेनेचे त्यातही ठाकरे कुटुंबियांच्या सर्व कायदेशीर व्यवहारांचीही जबाबदारी विश्वासाने सोपवली जाते.
- शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूपत्राच्या वादावर ठाकरे कुटुंबात सन्मानानं तोडगा निघाला होता.
- दिवंगत शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्रासारख्या खासगी बाबींपासून दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत आणलेल्या नगरसेवकांच्या कायदेशीर पुनर्वसनापर्यंत कायदेशीर कामे ते हाताळतात.
- मनसेपासून इतरही काही पक्षांतराची कामे त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसवून तडीस नेली, त्यामुळए मुंबई मनपात भाजपासून दोन जागांनी पुढे असणारी शिवसेना मोठ्या फरकाने पुढे गेली.
अनिल परब यांनी ७२ तासांची मुदत देऊन किरीट सोमय्यांविरोधात दावा दाखवल केला आहे. न्यायालयाने याची दखल घेतली आणि येत्या २३ डिसेंबर पर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना आदेश दिले आहेत. किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्या मानहानीप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. अनिल परब यांनी ट्विट करत लिहिले आहे की, “किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी आणि मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते. परंतु, त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.”
सध्या आक्रमक भूमिका बजावणाऱ्या सोमय्यांवर आता बाजी पलटताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा तसेच परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. पण आता परब यांनी त्यांच्या विरूद्ध आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
परबांच्या दाव्याला भिक घालत नाही – सोमय्या
- अनिल परब यांच्या दाव्याला आपण भीक घालत नाही.
- आता शिवसेनेला असे वाटणार नाही की फक्त आमचेच घोटाळे बाहेर काढतात.
- कोट्यवधी रुपयांचे घोटाळे बाहेर येणार आहे.
- लवकरच राष्ट्रवादीच्या परिवारातील एक मोठा घोटाळा बाहेर येणार आहे.