Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर परिवहन मंत्री अनिल परब ईडीसमोर हजर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
anil parab

मुक्तपीठ टीम

राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू अनिल परब अखेर ईडीच्या कार्यालयात हजर झाले. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केल्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. परमबीर सिंहांच्या पत्रानंतर उघड झालेल्या महाराष्ट्रातील शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची ईडी चौकशी करत आहे. ईडीने परिवहन मंत्री अनिल परब यांना शनिवारी समन्स बजावले होते आणि त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. याआधी एकदा समन्स बजावूनही न आलेल्या परब यांनी मंगळवारी मात्र हजेरी लावली.

 

परिवहन मंत्री अनिल परब मंगळवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी कार्यालयात हजर झाले. परब सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात पोहोचले. त्यावेळी मोठ्या संख्येने पोलीस दल तेथे उपस्थीत होते. ईडी कार्यालयाजवळ पत्रकारांशी बोलताना त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य देणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, मी माझी मुलगी आणि बाळासाहेबांची शपथ घेतो, मी काहीही चुकीचे केलेले नाही, त्यामुळे मी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे.

 

तीन वेळा विधानपरिषदेवर आमदार असलेल्या परब यांना यापूर्वी ईडीने ३१ ऑगस्टला हजर होण्यासाठी बोलावले होते पण त्यांनी आणखी वेळ मागितला होता.

 

ईडीकडे कोणती आहेत चौकशीची प्रकरणे?

  • ईडी महाराष्ट्रातील पोलिसांच्या मदतीने चालू असलेल्या शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची चौकशी करत आहे.
  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी हा आरोप केल्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
  • या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना गेल्या एप्रिल महिन्यात त्यांच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

 

समन्स देऊनही अनिल देशमुख हजर झाले नाहीत

  • अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत ५ वेळा बोलावले आहे पण ते एकदाही हजर झाले नाहीत.
  • हे टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे, पण न्यायालयानेही दिलासा दिलेला नाही.
  • ते म्हणालेत परमबीर सिंग यांनी हे आरोप केले, त्याआधी त्यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून काढून टाकण्यात आले होते.

 

बडतर्फ पोलीस अधिकारी आणि अंबानी स्फोटके प्रकरणातील आरोपी वाझे यांच्या जबानीवर केली जाईल चौकशी

  • मुकेश अंबानींच्या घराबाहेर विस्फोटक ठेवल्याबद्दल वाझे यांना एनआयएने अटक केली आहे.
  • या प्रकरणात सचिन वाझे यांनी दिलेल्या जबानीवर ईडी आज परबची चौकशी करू शकते.
  • परब यांनी वाझे यांचे आरोप फेटाळून लावले असून ते कोणत्याही प्रकारच्या तपासासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.
  • वाझेनीं त्यांच्या एका निवेदनात सांगितले आहे की, परब यांनी त्यांना फसवणूकीच्या यादीत समाविष्ट केलेल्या कंत्राटदारांविरोधात जानेवारी २०२१ मध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते आणि अशा ५० कंत्राटदारांकडून किमान २ कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते.

Tags: anil deshmukhAnil ParabEDNCPShivsenaपरमबीर सिंहपरिवहन मंत्री अनिल परबमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

“वीज बिल भरण्याची अट न घालता शेतकऱ्यांची जळालेली रोहित्रे बदलून द्या”

Next Post

मल्टिप्लेक्स उघडणार…पण त्याआधी ऑक्टोबरमध्ये OTTचा मोठा डंका!

Next Post
OTT

मल्टिप्लेक्स उघडणार...पण त्याआधी ऑक्टोबरमध्ये OTTचा मोठा डंका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!