Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मी लक्ष्य! परमबीरांच्या पत्रात ‘हे’ का नाही?”

 सचिन वाझेंच्या लेटरबॉम्बला परिवहन मंत्री अनिल परब यांचे उत्तर

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
anil parab

मुक्तपीठ टीम

सचिन वाझेंनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बदनाम करायचे कारस्थान आहे. त्यांना बदनाम करण्यासाठी मी त्यांचा जवळचा म्हणून मला लक्ष्य करण्यात येत आहे.

अॅड. परब यांनी वाझेंचा आरोप जून आणि जानेवारी महिन्यांमधील आहे तर मग मार्च महिन्यातील परमबीरांच्या पत्रात त्याचा उल्लेख का नाही, असा सवालही विचारला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब यांनी आपण कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. तसंच, माझ्या दोन मुलींची व बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो. माझ्यावरील आरोप खोटे आहेत, मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वक्तव्यातील महत्वाचे मुद्दे:

  • सचिन वाझेंचे आरोप आहेत की जून आणि जानेवारीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं. मग इतक्या दिवसांमध्ये त्यांनी यावर काहीही सांगितलं नाही.
  • परमबीर सिंग यांच्याही पत्रामध्ये याचा कुठेही उल्लेख नाही.
  • पण मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे हा एका धोरणाचा भाग आहे.
  • यातून सरकारला बदनाम करण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे.
  • त्यामुळे एनआयए, सीबीआय, रॉ, नार्टोटिक्स अशा कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे.
  • माझी चौकशी करावी आणि चौकशीत सत्य बाहेर येईल.
  • महापालिकेच्या कुठल्याही कंत्राटदाराशी माझी ओळख नाही.
  • सचिन वाझेंनी केलेले दोन्ही आरोप धादांत खोटे आहेत. ते दोन्ही आरोप मी नाकारतोय.
  • मी सच्चा शिवसैनिक आहेत. माझ्यावर खंडणीचे संस्कार नाहीत.
  • भाजपला सचिन वाझे पत्राविषयी आधीच माहिती होती.
  • गेले २-३ दिवस भाजपाचे पदाधिकारी आरडा ओरडा करत होते की आम्ही तिसरा बळी घेऊ. याचा अर्थ त्यांना दोन तीन दिवसांपासून या गोष्टींची कल्पना होती.
  • सचिन वाझे आज एनआयए कोर्टात पत्र देणार होते याची कल्पना बहुतेक त्यांना आधीच असेल.

Tags: अनिल परबमुख्यमंत्री उद्धव ठाकरेसचिन वाझे
Previous Post

बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावरील पुस्तकचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

एका दिवसात ६० हजाराजवळ नवे रुग्ण, ३० हजार बरे, ४८ तासात १२८ मृत्यू

Next Post
MRC 7-4-21

एका दिवसात ६० हजाराजवळ नवे रुग्ण, ३० हजार बरे, ४८ तासात १२८ मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!