Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनिल परबांचा शेवटचा अल्टिमेट… सोमवारपर्यंत कामावर या, निलंबन मागे घेतलं जाईल!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
anil parab

मुक्तपीठ टीम

एसटी कर्मचाऱ्यांनी गेला एक महिना विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून संप पुकारला आहे. या संपात एकूण दहा हजार कामगारांना निलंबित करण्यात आले आहे. आता या निलंबित कर्मचाऱ्यांना आता सोमवार पर्यंत संधी देण्यात आली आहे. सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर आले तर त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असा शेवटचा अल्टिमेटम राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. तसेच सोमवारपर्यंत मेस्मा न लावण्याचा तूर्तास निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

 

जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचं निलंबन मागे घेऊ

  • परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी शुक्रवार पुन्हा चर्चा केली.
  • त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधून ही माहिती दिली.
  • आम्हाला कामावर यायचं आहे.
  • पण काही लोक येऊ देत नाही असं काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
  • कामगार कामावर यायला तयार आहेत.
  • त्यामुळे त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचं निलंबन मागे घेऊ.
  • जो डेपो ५० टक्के संख्येने सुरू होईल त्यांना तिथेच कामावर घेऊ.
  • पण जिथे ही संख्या पूर्ण होत नाही.
  • त्यांना बाजूच्या डेपोत सामावून घेतलं जाणार आहे.
  • त्याबाबतचे लेखी आदेश काढणार आहोत.

 

तूर्तास मेस्मा न लावण्याचा निर्णय

  • आम्ही कारवाईबाबत पुढे गेलो आहोत.
  • सोमवार नंतर कठोर कारवाई होऊ शकते.
  • सोमवारी निलंबित कामगारांनीही कामावर यावं.
  • निलंबित झालेले नाही अशा कामगारांनीही कामावर यावं.
  • मला संधी दिली नाही असं वाटू नये म्हणून त्यांना एक संधी देत आहोत.
  • कामगारांना अडवलं गेलं तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी किंवा डेपो मॅनेजरला सांगावं.
  • जेणे करून त्यांना पोलीस संरक्षण पुरवले जाईल.
  • तूर्तास मेस्मा न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • मात्र, कामगार कामावर आले नाही तर त्याहूनही कठोर कारवाई केली जाईल.

 

आत्महत्या हा त्यावरचा पर्याय नाही

  • आतापर्यंत एसटीच्या १० हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
  • रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
  • तर काहींच्या बदल्या झाल्या आहेत.
  • कोर्टाशिवाय प्रश्न सुटणार नाही हे कामगारांच्या लक्षात आलं आहे.
  • कारवाई होईल का ही भीतीने ग्रासले आहे.
  • अनेक कर्मचारी गटा गटाने आमच्याशी संपर्क साधला आहे.
  • काही कर्मचाऱ्यांनी निलंबनाच्या भीतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
  • काही आत्महत्यांची कारण वेगळी असू शकतात.
  • आत्महत्येचा प्रयत्न याचा एसटीशी संबंध जोडला जात आहे.
  • आत्महत्या हा त्यावरचा पर्याय नाही.
  • तसेच एसटीच्या संपामुळे एसटीचे साडेपाचशे कोटींचं नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

Tags: Anil ParabST EmplyoeeST Strikeअनिल परबएसटी कर्मचारीएसटी संप
Previous Post

सीडीएस जनरल बिपीन रावत यांना अखेरचा निरोप

Next Post

राज्यात ओमायक्रॉनचे ७ नवे रुग्ण! तर कोरोनाचे ६९५ नवीन रुग्ण, ६३१ रुग्ण बरे!

Next Post
corona

राज्यात ओमायक्रॉनचे ७ नवे रुग्ण! तर कोरोनाचे ६९५ नवीन रुग्ण, ६३१ रुग्ण बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!