मुक्तपीठ टीम
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपात ईडीच्या कोठडीत आहेत. मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली असून आजपासून सुरु होणाऱ्या राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनात भाजपाकडून नवाब मलिक आणि अंडरवर्ल्ड संबंधाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान माजी आमदार अनिल गोटे यांनी १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इक्बाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून भाजपाने देणगी घेतला असल्याचा आरोप केला आहे. एवढंच नाही तर यासंदर्भात आपण ईडीकडे तक्रार देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले अनिल गोटे?
- २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं.
- त्यानंतर २०१४-१५ इक्बाल मिर्चीशी संबंधित असलेल्या कंपनीकडून भाजपला १० कोटींची देणगी मिळाली होती.
- कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असलेला आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी इक्बाल मिर्चीशी
- संबंधित असलेल्या RKW Developers Pvt Ltd म्हणजेच पंजाब महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी व सध्या तुरुंगात असलेल्या राकेश वाधवान याच्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बॅंक खात्यातून ही देणगी देण्यात आली.
- आपण ईडीकडे तक्रार देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
इक्बाल मिर्ची कोण होता?
- इक्बाल मिर्ची ड्रग माफिया होता.
- मिर्चीच्या व्यवसायातून अंडरवर्ल्ड मध्ये आला होता.
- इक्बाल मेमन हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळच्या सहकाऱ्यापैकी एक होता.
- अंमली पदार्थाची तस्करी करायचा.
- त्यानंतर दाऊदसाठी त्याने तस्करीचे काम सुरू केले असल्याचे म्हटले जाते.
- १९८७ च्या दरम्यान तो दुबईला पळाला होता.
- मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात ईडीने मिर्चीविरोधात आरोपपत्र दाखल केले.
- २०१३ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला होता.