Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

खमंग रुचकर ‘अंगत पंगत’ १७ मे पासून ‘फक्त मराठी वाहिनी’वर!

May 13, 2021
in प्रेस रिलिज
0
angat pangat

मुक्तपीठ टीम

 

‘फक्त मराठी वाहिनी’ने एकापेक्षा एक चित्रपट, कार्यक्रम, मालिकांद्वारे प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. या वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी ‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी’, ‘सप्तपदी’ या नव्या मालिकांच्या यशस्वी आगमनानंतर आणखी एका शोची तयारी सुरु झाली, काही भाग चित्रीतही झाले, परंतु याच काळात मुंबईसह महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाले. वाहिनीने आपल्या कलावंत तंत्रज्ञांच्या आरोग्याचा विचार करून तात्काळ सर्व मालिकांचे चित्रीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येऊ घातलेल्या ‘अंगत पंगत’ या खाद्य परंपरेवर आधारित आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे प्रसारण लांबणीवर गेले. आता हा शो येत्या १७ मे पासून ‘फक्त मराठी वाहिनी’वर सोमवार ते शुक्रवार दुपारी २:०० वाजता, प्रसारित प्रसारित होणार आहे.

 

‘अंगत पंगत’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण कुटुंबाला एकत्रित, गप्पा मारत हा शो पहाता येईल. आपल्या आवडीच्या खाद्य पदार्थांची रेसिपी, त्यांचा इतिहास, तसेच एकाच घटक पदार्थापासून महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी व विदेशात कसा व कोणता पदार्थ तयार केला जातो याची रंजक माहिती घेता येईल. स्वादिष्ठ आणि तृप्त करणाऱ्या खमंग पाककलांची बहारदार रेसिपी ‘अंगत पंगत’ या शोमध्ये पाहता येईल. तीन वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज असतील. या तिन्ही रेसिपी एकाच घटक पदार्थापासून तयार केल्या जाणार आहेत. यात पहिला विभाग – वदनी कवळ, अर्थात देशी, आपल्या मातीतले पदार्थ असतील. दुसरा विभाग – मिक्स मेजवानी, अर्थात फ्यूजन रेसिपीचा आणि तिसरा विभाग – सातासमुद्रापार यात साता – समुद्राबाहेरील पदार्थांची ओळख होणार आहे.

Angat

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक्सिक्युटीव्ह शेफ शंतनू गुप्ते ‘अंगत पंगत’मध्ये भारतीय पदार्त्यांसोबतच मॉडर्न युरोपियन रेसिपी प्रेक्षकांना तयार करून दाखविणार आहेत. त्यांनी युरोपमधील ‘नॉर्थ नॉर्वे’ विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेत्री सायली देवधर करीत आहे. तिचे खुमासदार सूत्रसंचालन ‘अंगत पंगत’ अधिकच रुचकर करणार आहे. या शो मध्ये दर शुक्रवारी आपल्या आवडत्या सेलिब्रेटींच्या आवडीचे पदार्थ ते स्वतः करून दाखविणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते संजय मोने, संदीप पाठक, रुपाली भोसले, स्नेहा रायकर, दीप्ती भागवत, ‘सप्तपदी’ मालिकेची नायिका तृप्ती देवरे असे अनेक लोकप्रिय कलाकार आपले आवडते पदार्थ बनवताना दिसतील आणि त्यासोबत मनमोकळ्या गप्पांतून सवांद साधतील.

 

‘अंगत पंगत’ या शोची निर्मिती निखिल रायबोले, भुपेंद्रकुमार नंदन यांच्या ‘कॅफे मराठी’ या संस्थेची असून दिग्दर्शन हेमंत तांबे यांचे आहे. प्रसिद्ध गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी या ‘अंगत पंगत’चे शीर्षक गीत लिहिले असून संगीतकार रोहित नागभिडे यांनी ते संगीतबद्ध केले आहे. ‘अंगत पंगत’चं लेखन अभिजित पेंढारकर यांचं असून छायांकन – नरेश राम शिवगन यांनी केले आहे. या शोची आकर्षक सजावट कलादिग्दर्शिका तृप्ती ताम्हाणे यांनी केले असून संकलन मनीष शिर्के, सिद्धेश हडकर यांचे आहे. या शो साठी ‘फक्त मराठी वाहिनी’चे वरिष्ठ कार्यकारी निर्माता संकेत पावसे तर बिझनेस हेड शाम मळेकर आहेत.

 

महाराष्ट्रासह जगभरातील खवय्यांसाठी खमंग चवदार रेसिपी ‘अंगत पंगत’मध्ये खुमासदार शैलीत दर सोमवार ते शुक्रवार दुपारी २:०० वाजता, आपल्या आवडत्या ‘फक्त मराठी वाहिनी’वर जरूर पहा.

 


Tags: Aangat pangatfakt marathi channelMaharashtraअंगत पंगतफक्त मराठी वाहिनीश्रीरंग गोडबोले
Previous Post

आज राज्यात ४२ हजार नवे, तर ५४ हजार घरी परतले! प. महाराष्ट्रात अद्याप गंभीर स्थिती

Next Post

मराठा आरक्षण: केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात, राज्याने जबाबदारी टाकल्यामुळे पाऊल उचलल्याची शक्यता!

Next Post
Maratha Reservation-11

मराठा आरक्षण: केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात, राज्याने जबाबदारी टाकल्यामुळे पाऊल उचलल्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!