मुक्तपीठ टीम
भारताची ओळख ही परंपरा, निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण आणि अतिथ्यशीलतेमुळे केली जाते. दक्षिणेतील राज्यांमध्ये निसर्ग सौंदर्यासोबतच पुरातन परंपरेचाही संगम झालेला दिसतो. श्रीशैलम हे स्थळही असंच. सुंदर आणि पारंपारिक वारशाचं वैभव जपणारं.
भारताचा दक्षिणेकडील भाग हा त्याच्या निसर्ग सौंदर्याच्या मुक्त उधळणीसाठीही खूप प्रसिद्ध आहे. आजूबाजूला हिरवाईने वेढलेले, येथील सुंदर शहरे मनाला भुरळ घालतात. देश-विदेशातून लोक येथे भेट देण्यासाठी येतात. आंध्र प्रदेश समुद्रकिनाऱ्यामुळे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. काही इथे समुद्रकिनारी फिरायला जातात तर काही इथली मंदिरं पाहायला जातात. आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठावर असलेले श्रीशैलम हे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. तुम्ही येथे महादेवी गुहा आणि चेंचू लक्ष्मी आदिवासी संग्रहालयाला भेट देऊ शकता.
श्रीशैलम येथे असणारी मनमोहक आकर्षक पर्यटन स्थळं
- श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर
या मंदिरावरूनच या शहराचे नाव पडले आहे. भगवान शिव म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर ‘दक्षिणेचे कैलास’ म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात भगवान शिव तसेच पार्वती, गणेश आणि कार्तिक यांची मूर्ती आहे.
- श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प
जर जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता. तीन हजार एकरांवर पसरलेला हा व्याघ्र प्रकल्प नागार्जुनसागर धरणाजवळ आहे. येथे तुम्हाला बिबट्या, चितळ, चिंकारा, अस्वल असे प्राणी पाहायला मिळतील. येथे तुम्हाला विविध प्रकारचे पक्षीही पाहायला मिळतात.
- पाताळगंगा
हे अतिशय प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. स्थानिक लोकही हे अत्यंत पवित्र स्थान मानतात. येथे कृष्णा नदी डोंगराच्या मधोमध वाहते, ज्याला स्थानिक लोक पाताळगंगा म्हणतात.