Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पूर ओसरला. मदत करणारेही. आता पूरग्रस्त विद्यार्थ्यांना नाना पाटेकर, मकरंद अनासपुरेंची मदत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
naam

मुक्तपीठ टीम

जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणाला मोठा फटका बसला. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. याचवेळी कोकणाच्या मदतीसाठी अनेकांनी हात पुढे केले. अनेक संस्था, अनेक दिग्गज लोकांनी यावेळी मदत केली. मात्र जसजसा कोकणातील पूर ओसरला तसतसे मदतीचे हातही ओसरत गेले. मात्र, अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचं नाम फाऊंडेशन मात्र पूरग्रस्तांना विसरले नाही. त्यांनी नुकतीच पोलादपूरच्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केलीय.

 

पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नाम फाऊंडेशन

  • गेल्या २१ व २२ जुलै रोजी आलेल्या महापूरात महाड आणि पोलादपूरमध्ये मोठे नुकसान झाले.
  • या तालुक्यांतील शालेय विद्यार्थ्यांना नाम फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्याखोच्या मध्ये वसलेल्या शाळांमधील ११६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहेत.
  • यामध्ये पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या बोरावळे शाळेतील ८ विद्यार्थी, घागरकोंड शाळेतील ८, रानवडी बुद्रुक २८, रानबाजिरे १२, कापडे बुद्रुक २०, महाळुगे धनगरवाडी ४, दहीदुर्गवाडी ३, तळ्याची वाडी १२, आडावळे बुद्रुक ११ व चांभरगणी बुद्रुक १० अशा एकूण दहा शाळातील ११६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
  • शैक्षणिक साहित्याचे किटमध्ये विद्यार्थ्यांसाठी दप्तर, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, लिहिण्याचे पॅड, स्केचपेन, रंगीत खडू, चित्रकला वही, कंपास पेटी व लेखनाच्या वह्या यांचा समावेश आहे.
  • तसेच सरपंच वैभव चांदे यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
  • बोरावळे ग्रामपंचायतीचे सरपंच वैभव चांदे, आवळे, घागरकोड शाळेचे मुख्याध्यापक सतीश शिंदे, बोरावळे शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील, माजी उपसरपंच पांडुरंग मोरे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश कोळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुप्रिया पाटील यांनी केले.

 

नाम फाऊंडेशन सदैव कोकणाच्या मदतीसाठी तत्पर

चित्रपट सृष्टीतील अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या नाम फाऊंडेशनने मागील वर्षभरात कोकण परिसरासाठी विशेषतः रायगड जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोलाचे सहकार्य केलेले आहे.
त्यामध्ये फयाण चक्रीवादळग्रस्त शेतकऱ्यांना केलेली मदत; महाड, पोलादपूर मधील महापुरा मध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना अन्नधान्याच्या स्वरूपात केलेली मदत आणि आज वाटप करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात केलेली मदत यांचा समावेश आहे.

 


Tags: flood-affected studentsMahadmakrand anaspureNaam Foundationnana patekarpoladpurकोकणनाना पाटेकरनाम फाऊंडेशनपूरग्रस्त विद्यार्थीपोलादपूरमकरंद अनासपुरेमहाडमुक्तपीठ
Previous Post

राज्यात १ हजार ७० नवे रुग्ण! बरे होण्याचे प्रमाणही वाढले!!

Next Post

दक्षिण भारतातील श्रीशैलम! परंपरा आणि निसर्ग सौंदर्याचा अनोखा मेळ!

Next Post
shrishailam

दक्षिण भारतातील श्रीशैलम! परंपरा आणि निसर्ग सौंदर्याचा अनोखा मेळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!