मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून चांगलचं राजकारण तापलं आहे. ऋतुजा लटके बुधवारी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी आमची निष्ठा उद्धव साहेबांसोबत आपण शिवसेनेच्या मशाल चिन्हावरच आपण निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं. मुंबई महापालिका सेवेचा राजीनामा देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया ऋतुजा लटके यांनी केली आहे. राजीनामा मंजूर करण्याची मागणी त्या पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे करणार आहेत.
काय म्हणाल्या ऋतुजा लटके?
- ऋतुजा लटके या आज महापालिका कार्यालयात आल्या आहेत. महापालिकेच्या सहायक आयुक्तांकडे राजीनाम्याबाबतची माहिती घेण्यासाठी त्या आल्या आहेत. यावेळी मीडियाने त्यांना घेरलं असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
- तुमच्यावर दबाव असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ऋतुजा लटके यांनी माझ्याकडे बघितल्यावर तुम्हाला वाटतंय का माझ्यावर दबाव आहे म्हणून? असं प्रतिप्रश्न त्यांनी केला.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण भेटल्याचं बोललं जात आहे, या प्रश्नावरही त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली.
मी निवडणूक लढणार ती मशाल या चिन्हावरच!!
- आमची निष्ठा उद्धव साहेबांसोबत आहे.
- माझे पती रमेश लटकेंची निष्ठा उद्धव साहेब आणि बाळासाहेबांसोबत होती.
- आता मी कमिश्नर साहेबांना भेटणार आहे. राजीनाम्याबाबत विनंती करणार की आजच्या आज मंजूर करावा. सोमवारी नोटीस पे – चलन जीएडीकडून दिलं, मी पेमेंट केलं.
- सोमवारपासून तिसरा दिवस आहे मी जीएडी कार्यालयात येऊन बसतेय.
- एओंनी सांगितलं की सगळं रेडी आहे, फक्त सहीमुळे तुमचा राजीनामा मंजूर करायचा राहिला आहे.
- मी निवडणूक लढणार ती मशाल या चिन्हावरच.