मुक्तपीठ टीम
अंधेरी पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार हे येत्या काही दिवसातचं कळेल. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या पक्षाकडून ऋतुजा रमेश लटके आणि भाजपाकडून मुरजी पटेलांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपाकडून यावेळी मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.
शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन!!
- शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.
- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या ऋतुजा लटके, भाजपकडून मुरजी पटेल यांनी आपले नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे.
- अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अंधेरीत मोठे शक्तिप्रदर्शन केले.
- यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, गजानन किर्तिकर, अनिल परब आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांनी हजेरी लावली.
भाजपाकडून पटेल मैदानात!
- शक्ति प्रदर्शन झाल्यानंतर भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
- मुरजी पटेल यांच्यासोबत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, भाजप नेते आशिष शेलार सहभागी झाले होते.
- यावेळी त्यांनी आमचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त केला.
- अंधेरीत अटीतटीचा सामना रंगणार असल्याचं दिसून येत आहे.