मुक्तपीठ टीम
भारतीय संघाचा नवा वेगवान गोलंदाज टी नटराजनने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नटराजनशिवाय शुबमन गिल, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज या नव्या खेळाडूंनीही मोठे योगदान दिले आहे. या तरुणांच्या कर्तृत्वाने महिंद्रा अॅन्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा प्रभावित झाले. त्यांनी या युवा खेळाडूंना महिंद्रा थारही भेट दिली आहे.
आनंद महिंद्रा यांनी आपला शब्द पाळला आहे. त्यांनी नटराजन यांना महिंद्रा थार ही पाठविली आहे. भारतीय वेगवान गोलंदाजाने ट्विट करुन त्याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले, “भारतासाठी क्रिकेट खेळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे. या मार्गावर जाणे माझ्यासाठी एक वेगळाच प्रवास आहे. या प्रवासात मला मिळालेल्या प्रेमामुळे आणि ओळखीमुळे मी भारावून गेलो आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर झालेल्या सामन्यात नटराजनने तीन गडी बाद केले होते. नटराजन यांनी आपल्या दुसर्या ट्विटमध्ये लिहिले आहे. “मी आज महिंद्रा थार ड्राईव्हिंग करून घरी आलो आहे. मी आनंद महिंद्रा यांचे आभार मानतो. त्यांनी मला प्रोत्साहन दिले. क्रिकेटबद्दल तुमचे प्रेम खूपच मोठे आहे. मी तुम्हाला गाबा टेस्टचा माझा शर्ट सही करून देत आहे. ”
झोपडीत राहणाऱ्या नटराजनचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास खूप थरारक होता. स्टॅन्डबॉय बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या संघात नटराजनचा समावेश होता. टी -२० संघात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला झालेल्या दुखापतीमुळे तो त्या मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी नटराजनला स्थान मिळाले. २७ नोव्हेंबरला जेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना खेळणार होती, तेव्हाही नटराजनला नवदीप सैनीचा कव्हर म्हणून एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले होते. पण त्याने करुन दाखवले.
पाहा व्हिडीओ: