मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात राजकीय वातावरण संतप्त होताना दिसत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून भाजपद्वारे पुन्हा पुन्हा वाद माजवला जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आमदार मंगप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड आणि यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी शिवरायांवर टीका करण्याचा हा विडा उचलला आहे. यावरून भाजपवर इतर पक्षांकडून आक्रोश केला जात आहे. रावसाहेब दानवेंनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावर अमोल मिटकरींनी संतप्त प्रतिक्रिया मांडली आहे.
भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनीही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. काही दिवसांपासून चांगलच तापलेले हे वातावरण आणखीनच चिघळत चालले आहे. दानवे यांच्या वक्तव्यावरून मिटकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरींचे संतप्त वक्तव्य!
- भाजपच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा सुरू केली आहे.
- आता परत एकदा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेण खाल्ले आहे.
- या भाजपच्या हरामखोर लोकांना रायगडावरून कडेलोट करण्याची वेळ आली आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करत भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली असल्याचा आणखी एक पुरावा आहे असे, वक्तव्य आमदार मिटकरी यांनी केले आहे.
रावसाहेब दानवेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केला एकेरी उल्लेख
- महाविकास आघडीकडून राज्यपालांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे, असा प्रश्न दानवेंना विचारण्यात आला होता.
- यावर ते म्हणाले की, राज्यपालांनी कोणत्या पार्श्वभूमीतून हे वक्तव्य केले याची एकदा चौकशी करणे गरजेचे आहे.
- मी पण शिवप्रेमी आहे. मलाही असे वाटते की, शिवाजी बद्दल असे वक्तव्य कोणी करु नये.
- खरंतर, शिवाजी अवमान करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले आहे का? याचाही विचार झाला पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले
- या वक्तव्याचा व्हिडीओ एका ट्विटवर यूजरने पोस्ट केला आहे.