मुक्तपीठ टीम
बॉलीवूड विश्वातीतल बिग बी, अनुभवी कलाकार अमिताभ बच्चन यांना कोण ओळखत नाही. सर्वांनाच ते माहित आहेत. बिग बी सोशल मीडियावरही नेहमीच अॅक्टिव्ह असतात. याद्वारे ते स्वत:ला त्यांच्या चाहत्यांशी जोडतात. कोरोना संसर्ग झाला असतानाच आता बिग बींची चर्चा होण्याचे कारण म्हणजे त्यांचे ट्वीट. बिग बींचे एक ट्विट व्हायरल होत आहे ज्यामुळे ते कशाबद्दल बोलत आहेत, याबद्दल चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. या ट्वीटवर यूजर्स भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.
अमिताभ बच्चन यांचं चर्चा टाळणारं ट्वीट ठरलं चर्चेचा विषय!
- अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, “काही गोष्टी बोलण्याचे मन होते; पण ते बोलायचं तरी कसे, आजकाल प्रत्येक गोष्टीचा मुद्दा बनवला जातो.”
- त्याच्या या ट्विटने चाहत्यांना ते कशाबद्दल बोलत आहेत याचा विचार करायला भाग पाडले.
बिग बींच्या ट्विटवर चाहत्यांच्या कमेंट्स!
- एका यूजरने लिहिले, काही लोक म्हणतील, ‘कुछ तो लोग कहेंगे, ‘लोगों का काम है कहना!’ तुम्ही ब्लॉगवर तुमच्या मनात असेल ते लिहा, आम्ही त्यावर कुणाचीही मर्जी चालू देणार नाही.’
- दुसर्या यूजरने लिहिले की, ‘बोलणे ही चांगली गोष्ट आहे आणि बोलल्याने मनातील वेदना दूर होतात.’
- एका यूजरने लिहिले की, सर, तुम्हाला जे हवे ते करा आणि कमेंट बॉक्स विसरा.
- दुसर्या यूजरने लिहिले, जर आपण बोललो तर त्याबद्दल बोलले जाईल! अन्यथा, तुम्हाला पुन्हा मन की बात फक्त रेडिओवरच करायला मिळेल.