Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बिहारमध्ये सीबीआय धाडी, तरीही नितिशकुमार-तेजस्वी सरकारने सिद्ध केले बहुमत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nitish kumar tejasvi yadav

मुक्तपीठ टीम

बिहारमध्ये बहुमत चाचणीच्या दिवशीच सीबीआयकडून धाडसत्र सुरु झाले. सीबीआयने बिहारमधील एकूण २४ ठिकाणी छापे टाकले आहेत. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित नोकरी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने नेत्यांच्या घरावर छापेमारी केली आहे.राजदने या सीबीआयच्या धाडी नसून भाजपा संघटनेच्या धाडी असल्याचं म्हटलं आहे. तसेच हे सूडाचे राजकारण असल्याचा भाजपावर आरोप केला आहे. एकीकडे या धाडी सुरु असतानाच दुसरीकडे बिहारमध्ये जदयू-राजदच्या नितिशकुमार-तेजस्वी यादव सरकारने बहुमत सिद्ध केलं आहे.

पाहा काय घडलं बिहार विधानसभेत…

 

नितिशकुमार-तेजस्वी सरकारने सिद्ध केले बहुमत!

  • बिहार विधानसभेत आज बहुमत चाचणी होती.
  • बहुमत चाचणीच्या आधी भाजपा नेते यांनी विधानसभेचे अध्यक्ष विजय सिन्हा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • त्यामुळे त्यांच्याजागी उपाध्यक्ष महेश्वर हजारी यांनी काम पाहिले.
  • बहुमत चाचणीच्यावेळी भाजपाने नितिशकुमारांना लक्ष्य करत आक्रमक आरोप केले.
  • पण अखेर बाहेर धाजी पडत असतानाच नितिशकुमार-तेजस्वी सरकारने सिद्ध बहुमत सिद्ध केले.

या नेत्यांच्या ठिकाणी छापा!!

  • आरजेडीचे राज्यसभा खासदार अशफाक करीम यांच्या घरावर छापे टाकण्यात येत आहेत.
  • यासोबतच आणखी एक राज्यसभा खासदार डॉ.फयाज अहमद यांच्या मधुबनी येथील घरावर छापा टाकला आहे.
  • राजदचे एकूण चार नेते रडारवर आहेत.
  • यामध्ये राबडी देवी यांचे खासगी सचिव नागमणी यादव आणि माजी आमदार आरजेडी अबू दोजाना यांचा समावेश आहे.
  • यासोबतच सुनील सिंह यांच्या ठिकाणीही छापेमारी सुरू आहे.

आम्ही घाबरत नाही – राबडी देवी

  • या छाप्यांवरून बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
  • भाजपा नव्या सरकारला घाबरत आहे.
  • छापे टाकून आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण आम्ही घाबरणार नाही.
  • बिहारची जनता आमच्यासोबत आहे.
  • त्याचवेळी या छाप्याबाबत आरजेडी नेते मनोज झा म्हणाले की, याला एजन्सींचे छापे म्हणू नका, भाजपा संघटनांचे छापे म्हणा.
  • ते भाजपाच्या अंतर्गत काम करतात.
  • भाजपाच्या स्क्रिप्टवरच या कार्यालयांचं कामकाज सुरु आहे.
  • आज बहुमत चाचणी आहे आणि आता काय सुरु आहे? आता याचा पूर्ण अंदाज आला आहे.

काय आहे भरती घोटाळा?

  • लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन आणि भूखंड घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
  • या प्रकरणाच्या तपासानंतर सीबीआयने लालू प्रसाद यादव, राबडी देवी, मिसा यादव, हेमा यादव आणि काही संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता.
  • या प्रकरणात ज्यांना भूखंड किंवा मालमत्तेच्या बदल्यात नोकरी देण्यात आली होती.
  • यापूर्वी मे महिन्यात सीबीआयकडून याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित १७ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.
  • सीबीआयची ही कारवाई तब्बल १४ तास चालली होती.
  • त्यावेळी लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगी मिसा भारती यांच्या पाटणा, गोपालगंज आणि दिल्लीतील घरांवरही छापा टाकण्यात आला होता.

Tags: CBInitish kumarTejaswi Yadavतेजस्वी यादवनितीश कुमारबहुमत चाचणीबिहारभरती घोटाळासीबीआय
Previous Post

अमिताभ बच्चन यांचं चर्चा टाळणारं ट्वीटच ठरलं चर्चेचा विषय!

Next Post

राज्यात १९१० नवे रुग्ण, १२७३ बरे! मुंबई ८३२, नाशिक १५, नागपूर २४ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १९१० नवे रुग्ण, १२७३ बरे! मुंबई ८३२, नाशिक १५, नागपूर २४ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!