मुक्तपीठ टीम
तोट्यात चालणारी सरकारी विमान कंपनी एअर इंडिया लवकरच नवीन मालकाकडे सोपवली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या समुहात नवीन मालकाबद्दल निर्णय घेतला जाईल. पुढील आठवड्यात सरकार एअर इंडियाचा ताबा तिचे मूळ संस्थापक मालक असणाऱ्या टाटा समूहाकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. टाटा समुहाची बोली एअर इंडियासाठी ठरवलेल्या राखीव किंमतीच्या तीन हजार कोटींनी जास्तही आहे. पण स्पाईसजेटचे प्रवर्तक अजय सिंहही या शर्यतीत आहेत. मात्र, अंतिम निर्णय एका आठवड्यानंतरच घेण्यात येईल.
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, सरकारने एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. एअर इंडियाच्या संचालनाची जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे सोपवण्यासाठी जे काही नियम आणि कायदे आहेत, ते पाळले जात आहेत. ते फक्त एका प्रक्रियेद्वारे होईल.
टाटा एअरलाइन्सची राष्ट्रीयीकरणानंतर एअर इंडिया!
- सरकारने टाटाशी केलेला करार ठरल्यास, विमान कंपनीला ६८ वर्षांनंतर ‘घर वापसी’ मिळेल.
- टाटा समूहाने ऑक्टोबर १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्स नावाने एअर इंडिया सुरू केली.
- १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय विमानसेवेची गरज भासू लागली.
- अशा परिस्थितीत भारत सरकारने एअर इंडियामध्ये ४९ टक्के हिस्सा विकत घेतला.
- यानंतर १९५३ मध्ये, भारत सरकारने एअर कॉर्पोरेशन कायदा पास केला आणि नंतर टाटा समूहाकडून कंपनीतील बहुसंख्य भाग खरेदी केला.
एअर इंडियासाठी कोणाच्या बोली?
- टाटा समूहाची बोली सरकारने निश्चित केलेल्या राखीव किंमतीपेक्षा सुमारे ३००० कोटी रुपये जास्त आहे.
- टाटाची बोली स्पाइसजेटचे चेअरमन अजय सिंह यांनी दिलेल्या बोलीपेक्षा जवळपास ५००० कोटी रुपये इतकी जास्त आहे.