Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचं तिहारमधील दहशतवाद्याशी कनेक्शन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
tihar jail

मुक्तपीठ टीम

मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया घराबाहेर स्फोटके ठेवल्याचा मेसेज ज्या फोनमधून करण्यात आला होता तो आता दिल्लीच्या तिहार कारागृहातून जप्त करण्यात आला आहे. हा मोबाईल तुरुंगातील खोली क्रमांक ८ मध्ये बंद असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीन अख्तरकडे होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.

तिहार कारागृहात गुरुवारी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून रात्री ९.०० वाजेपर्यंत दिल्ली स्पेशल सेलनं तिहार कारागृहाची तपासणी केली. त्या तपासणीत इंडियन मुजाहिद्दीचा दहशतवादी तहसीन अख्तर याच्या बराकीमधून मोबाईल जप्त करण्यात आला. याच मोबाईलवरून टेलीग्राम चॅनल चालवले जात होते. या चॅनलच्या माध्यमातून अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी घेण्यात आली होती. आता या मोबाईलची न्यायवैद्यक तपासणी होणार असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

एनआयएने एका खासगी सायबर एजेंसीला फोन ट्रॅक करण्याचे काम सोपवले होते. पोलिसांना एका खाजगी सायबर एजेन्सीनं त्या फोनच्या लोकेशनबाबत माहिती दिली. ज्यावरुन टेलिग्राम चॅनल बनवलं होतं.

सिमकार्डचे लोकेशन तिहार कारागृह

  • खासगी सायबर संस्थेने तयार केलेल्य अहवालानुसार, हे टेलिग्राम चॅनल २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता त्या मोबाईलमध्ये ‘टोर ब्राउजर’द्वारे व्हर्च्युअल क्रमांक तयार करण्यात आला.
  • या नेटवर्कचा वापर डार्क वेब वापरण्यासाठी केला जातो.
  • ज्या मोबाईलमधून हा संपूर्ण प्रकार करण्यात आला त्याच्या सिमकार्डचे लोकेशन तिहार कारागृह दाखवले होते.
  • अँटीलियासमोर २४ फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-उल-हिंदने २८ फेब्रुवारी रोजी घेतली होती.
  • स्फोटके ठेवल्याची जबाबदारी घेणाऱ्या संघटनेने लिहिले होते की “हा तर फक्त ट्रेलर आहे, आम्हाला थांबवूनच दाखवा. तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुमच्या देखत दिल्लीत हल्ला केला होता, तुम्ही मोसादशी हात मिळवणी केली तरी काहीच करू शकला नाहीत. तुम्हाला आधीच सांगितले होते, पैसे ट्रांसफर करून टाका बस.”
  • पण, दुसऱ्याच दिवशी आणखी एका टेलिग्राम चॅनलने हा दावा फेटाळून लावताना एक पोस्टर जारी केले होते.

काय आहे प्रकरण?

  • २५ फेब्रुवारी रोजी अँटीलियासमोर स्कॉर्पिओ कार सापडली.
  • ही कार २४ फेब्रुवारीच्याच मध्यरात्री ठेवण्यात आली होती.
  • दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्या कारमधून जिलेटीनच्या २० कांड्या जप्त केल्या.
  • या स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेनची वेळोवेळी चौकशी करण्यात आली. त्याने आपली कार चोरीला गेल्याची तक्रारही दिली होती.
  • ५ मार्च रोजी त्याचा मृतदेह सापडला. त्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात आली.
    आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक करत आहे.

Tags: Indian Mujahidin Terrorist Tahsin AkhtarTihar Jailअँटीलियाइंडियन मुजाहिद्दीन दहशतवादीटेलीग्रामतिहार कारागृहमुकेश अंबानी
Previous Post

#अध्यात्म इच्छा असावी पण अपेक्षा नसाव्या!

Next Post

गुन्हे महत्त्वाचे: 1)कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, शासनाकडून आखून दिलेल्या नियमाची पायमल्ली सुरूच आहे. कल्याण पूर्वेत नियमाची पायमल्ली करत बुधवारी संध्याकाळी ७०० लोकांच्या उपस्थितीत रंगलेल्या जंगी विवाह सोहळ्याच्या आयोजकांविरोधात पालिका प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2)अकोल्यात आईची हत्या केल्याप्रकरणी मुलीला अटक करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारातून सख्ख्या मुलीनेच आपल्या आईला संपवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. माहेरकडून जमीन मिळाल्यानंतरही आर्थिक देवाणघेवाणीवरुन वाद झाला. अखेर मुलीने आईला दगडावर आपटून मारलं. 3)महादेवाचे त्रिशूळ वर्ध्यातील वृद्धासाठी मृत्यूचा फास ठरले. त्रिशूळात मान अडकल्यामुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत पूजा करताना हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 4)८ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या टॅक्सीचालकास ठाणे न्यायालयाने नुकतीच १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. ही पीडित मुलगी आणि आरोपी एकाच सोसायटीमध्ये राहतात. 5)संचारबंदीच्या वेळेत एकत्र जमून धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर दोघांनी कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत एरंडवण्यात हा प्रकार घडला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!