मुक्तपीठ टीम
स्मार्टकाळाच्या जगात स्मार्ट राहणीमानालाही तितकच महत्त्व आहे. लोक जितकं शक्य असेल तितकं स्मार्ट राहण्याचा प्रयत्न करतात. कधी स्मार्टफोन वापरून तर, कधी स्मार्टवॉच वापरून… सध्या स्मार्टवॉचची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतेच, Amazfit या कंपनीने आपला नवीन फिटनेस ट्रॅकर Amazfit Band7 लॉंच केले आहे. आता, कंपनी Amazfit Band7 भारतीय बाजारात लॉंच करण्याच्या तयारीत आहे.
Amazfit Band7 फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- अॅमझफिटच्या आगामी वेअरेबलमध्ये १.४७ इंच एचडी अॅमोल्ड डिस्प्ले, २४/७ हार्ट रेट मॉनिटर, SPO2 मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, स्ट्रेस ट्रॅकर, स्लीप ट्रॅकिंग, स्टेप ट्रॅकिंग, महिला आरोग्य ट्रॅकिंग आणि पीरियड ट्रॅकर हे फिचर्स आहेत.
- तसेच, इनबिल्ट Amazon Alexa सारखे फिचर्स आहेत.
- कंपनीचा दावा आहे की ते नियमित वापरात सलग १८ दिवसांपर्यंत याची बॅटरी चालू शकते आणि बॅटरी सेव्हर मोडसह २८ दिवसांपर्यंत चालण्याची याची क्षमता आहे.
- Amazfit Band7 मध्ये १२० स्पोर्ट्स मोड देखील आहेत. याव्यतिरिक्त, ते ५ एटीएमच्या जल-प्रतिरोधक रेटिंगसह येते.
- हे ५०पेक्षा जास्त वॉच फेससह प्री-लोडेड आहे त्यापैकी ८ वॉच फेस दिलेले आहेत.
- हे ऑलवेज-ऑन डिस्प्ले फंक्शनलिटीला सपोर्ट करते.
अमॅझफिट बॅंड ७ लवकरच भारतात लॉंच होणार आहे. या वर्षी जुलैमध्ये हा बँड जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला. अमॅझफिट बॅंड ७ची किंमत अंदाजे ४ हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.