मुक्तपीठ टीम
गुगलने बग रिपोर्टसाठी इंदूरचे रहिवासी अमन पांडे यांना ६५ कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. अमन इंदूरमध्ये बग्समिरर नावाची कंपनी चालवतो. गुगलने गेल्या वर्षी ज्यांनी त्यांच्या विविध सेवांमधील बग शोधले त्यांना ८७ दशलक्ष डॉलर दिले गेले. गुगलने आपल्या अहवालात इंदूरच्या अमन पांडे यांचा विशेष उल्लेख केला आहे. जे बग्समिरर कंपनीचे संस्थापक आहेत. गुगलने आपल्या अहवालात म्हटले आहे की, बग्समिरर टीमचे पांडे हे गेल्या वर्षी आमचे सर्वोच्च संशोधक होते. त्यांना भारतीय चलनानुसार तब्बल ६५ कोटी देण्यात आले आहेत.
अमन पांडेंची चमकदार कामगिरी!
- अमन पांडेंनी गेल्या वर्षी २३२ बग शोधले होते.
- त्यांनी २०१९ मध्ये प्रथमच आपला अहवाल दिला आणि तेव्हापासून त्यांनी अॅंड्रॉईड व्हल्नेरेबिलिटी रिवॉर्ड प्रोग्रामसाठी २८० हून अधिक धोके नोंदवले आहेत.
- गुगलचे ते प्रोग्राम यशस्वी होण्यासाठी त्यांनी शोधलेले बग महत्त्वपूर्ण ठरले आहे.
अमन पांडे लोकल पातळीवरून ग्लोबल कामगिरी!
- अमन पांडे यांनी भोपाळ एनआयटीमधून बीटेक केले आहे.
- २०२१ मध्ये त्यांनी कंपनीची नोंदणी केली होती.
अमन पांडे यांची कंपनी बग्समिरर गुगल, अॅप्पल आणि इतर कंपन्यांना त्यांची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत बनवण्यात मदत करते.
अॅंड्रॉईड व्हीआरपीने २०२०पेक्षा २०२१ मध्ये दुप्पट पैसे दिले आणि अॅंड्रॉईडमध्ये एक्सप्लाइट चेन शोधण्यासाठी १,५७,000 डॉलर दिले, ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे.
अमन पांडे यांच्या जीवनावर आधारित मुद्दे
- अमन पांडे हे मूळचे झारखंडचे आहेत. सुरुवातीचे शिक्षण पतरातू येथे झाले.
- त्यानंतर बोकारो येथील चिन्मय विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
- अमनने बारावीनंतर भोपाळ एनआयटीमधून बीटेक केले आहे.
- त्यांची बग्समिरर कंपनी जानेवारी २०२१ मध्ये सुरू झाली आहे.
- त्यांची मॅनेजमेंट टीम चौघांची आहे. बाकीचे इंटर्न आहेत.
- ते म्हणाले की आम्ही स्टार्टअप म्हणून याची सुरुवात केली.