मुक्तपीठ टीम
डिजिटल तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन उपक्रमांना चालना मिळत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ऑनलाइन पोर्टल, ब्रॉडकास्ट सेवा पोर्टल सोमवारपासून औपचारिकपणे काम करण्यास सुरुवात करेल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर या सेवेचा शुभारंभ करणार आहेत.
या मुळे सरकारकडून आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रकारची परवानगी आणि मंजुरी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल. एवढेच नाही तर, हे पोर्टल इतर मंत्रालयांशीही जोडले जाईल. यामुळे प्रक्रियेला गती मिळेल आणि अर्जदार त्यांच्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतील.
ऑनालाइन पोर्टल सुविधेचा जनतेला होणारा लाभ
- पोर्टलच्या माध्यमातून ब्रॉडकास्टर्सना यापुढे कोणत्याही परवानगीसाठी मंत्रालयांच्या विविध विभागांना भेट द्यावी लागणार नाही.
- तसेच परवानग्यांमध्ये बदल करणे आणि शुल्क भरण्याव्यतिरिक्त ते ऑनलाइन अर्ज आणि परवानग्या मिळवू शकतील. त्यांना याचा लाभही घेता येणार आहे.
- या सुविधेमुळे हे पोर्टल इतर मंत्रालयांच्या पोर्टलशीही जोडले जाईल.
- यामुळे आंतर-मंत्रालयीन परवानग्या मिळण्याचीही सोय होईल.
- खासगी सॅटेलाइट टीव्ही चॅनेलच्या अपलिंकिंग, डाउनलिंकिंग आणि टेलिपोर्टिंगच्या मदतीने, वृत्तसंस्थांच्या अपलिंक बातम्यांसाठी एसएनजी, डीएसएनजी वापरण्यासाठी परवानगी आवश्यक आहे.
- अशा अर्जदारांसाठी या सेवेचे हे नवीन व्हर्जन आणि दृष्टीकोन उपयुक्त ठरेल.
पाहा व्हिडीओ: